भारताच्या 'नाडा' आवळल्या; सहा महिन्यांसाठी बंदी घातल्यावर क्रीडा मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 20:25 IST2019-08-23T20:22:53+5:302019-08-23T20:25:48+5:30

बंदीविरोधात क्रीडा मंत्री मागणार दाद.

The World Anti-Doping Agency (WADA) has suspended the accreditation of the National Dope Testing Laboratory (NDTL) | भारताच्या 'नाडा' आवळल्या; सहा महिन्यांसाठी बंदी घातल्यावर क्रीडा मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

भारताच्या 'नाडा' आवळल्या; सहा महिन्यांसाठी बंदी घातल्यावर क्रीडा मंत्र्यांनी दिले स्पष्टीकरण

नवी दिल्ली : भारताच्या राष्ट्रीय उत्तेजक विरोधी संस्थेवर (नाडा) आता सहा महिन्यांची बंदी घालण्यात आली आहे. जागतिक उत्तेजक विरोधी संस्थेने (वाडा) हा निर्णय घेतला आहे. 'नाडा'मध्ये गेल्या काही वर्षांपूर्वी भ्रष्टाचार घडला होता. या गोष्टीची चौकशी आता वाडा करणार आहे. 'नाडा'च्या प्रयोग शाळेमध्ये काही वर्षांपूर्वी घोटाळा झाल्याचे म्हटले जात आहे, पण 'वाडा'ने आतापर्यंत याबाबत ठोस कारण सांगितलेले नाही.

Image result for national anti doping agency

भारताचे क्रीडा मंत्री किरन रिजिजू यांनी याबाबत स्पष्टीकरण देताना सांगितले की, " गेल्या काही वर्षांपासून 'नाडा'मध्ये काही वाईट गोष्टी घडल्या होत्या. पण हे पद सांभाळल्यापासून मी या गोष्टी सुधारण्याचा प्रयत्न केला. पण वाडाने जी बंदी घातली आहे त्याविरोध आम्ही दाद मागणार आहोत."


 

Web Title: The World Anti-Doping Agency (WADA) has suspended the accreditation of the National Dope Testing Laboratory (NDTL)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Indiaभारत