२६ वर्षीय दुतीचंद पॅरिस ऑलिम्पिकनंतर विवाहबद्ध होणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 15, 2022 09:30 AM2022-07-15T09:30:38+5:302022-07-15T09:31:45+5:30

समलैंगिक विवाहामुळे प्रमाणपत्र मिळणार नसल्याची जाणीव.

Wont get marriage certificate but might get married after Paris Olympics Dutee Chand reveals plans for | २६ वर्षीय दुतीचंद पॅरिस ऑलिम्पिकनंतर विवाहबद्ध होणार

२६ वर्षीय दुतीचंद पॅरिस ऑलिम्पिकनंतर विवाहबद्ध होणार

googlenewsNext

भुवनेश्वर : दुतीचंद २६ वर्षांची ऑलिम्पिक धावपटू. ओडिशाच्या दुर्गम भागातील विणकर कन्या. १०० आणि २०० मीटर शर्यतीतील आशास्थान असलेली ही खेळाडू बर्मिंगहॅम राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत चार बाय १०० मीटर महिला रिले (शर्वनी नंदा, हिमा दास, धनलक्ष्मी, हमव्ही जिल्ना, एमएस सीमी यांच्यासोबत) शर्यतीचा भाग असेल. या प्रकारात भारताला सुवर्ण मिळण्याचा विश्वास आहे. याआधी दोनदा राष्ट्रकुलला मुकलेल्या दुतीचे स्वप्न यंदा साकार होत आहे. खरेतर २०२४च्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी दुती सज्ज होत असून तिचा सरावही सुरू आहे.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत घडलेल्या दुतीचा प्रवास अडथळ्यांचा ठरला. शरीरात पुरुषांचे हार्मोन्स असल्याचा तिच्यावर आरोप झाला. दुती मात्र न डगमगता पुढे गेली. आपण समलैंगिक असल्याचा दुतीने हसत हसत स्वीकार केला. दुतीचंद २६ वर्षांची व तिची महिला पार्टनर अवघ्या २२ वर्षांची आहे. तीन वर्षांपासून दोघी एकत्र असतात. यासाठी दुतीवर टीकेचा भडिमारही झाला. दुती जेव्हा ओडिशातील स्वत:च्या गावात असेल तेव्हा लोक विचारत विवाह कधी करणार? समलैंगिक विवाहाला देशात अद्याप कायदेशीर मान्यता नाही. तरीही काहींनी विवाह केलाच, पण ते विवाह नोंदणीच्या भानगडीत पडले नाहीत. यासंदर्भात सोशल मीडियातील प्रत्येक घडामोडींवर दुतीचे लक्ष असते. ती म्हणते, ‘पॅरिस ऑलिम्पिक संपताच आम्ही विवाहबद्ध होणार आहोत.’ ‘मी पुढील तीन वर्षे खेळत राहणार. मी घरी नसते तेव्हादेखील आपल्या पार्टनरला लग्नाचा विश्वास देत असते. २०२४ नंतर आम्ही कायम एकत्र राहणार, असा निर्णय घेतला आहे.’

भारतात अशा जोडप्यांना अधिकृत मान्यता नसल्याने विदेशात स्थायिक होणार का? यावर दुती म्हणाली, ‘अनेक योजना आहेत, पण ऑलिम्पिकपर्यंत थांबा. माझ्या पार्टनरचे मतदेखील जाणून घ्यावे लागेल. लग्नाबाबत वकिलांशी चर्चा केली तेव्हा कळले की ‘कोर्ट मॅरेज’ होऊ शकणार नाही. त्यामुळे कोर्टातून विवाह प्रमाणपत्र मिळण्याचा  प्रश्नच नाही. मात्र, आमच्या दोघींकडील सर्वजण विवाहास राजी आहेत.’ आंतरराष्ट्रीय कोर्टात पुरुष नव्हे, तर स्त्री ही लढाई जिंकल्यानंतर समलैंगिक विवाहाची लढाईदेखील जिंकेन, असा विश्वास दुतीने व्यक्त केला.

Web Title: Wont get marriage certificate but might get married after Paris Olympics Dutee Chand reveals plans for

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.