शहरं
Join us  
Trending Stories
1
महिलांना तालावर नाचायला लावणाऱ्या औषधाबाबत गूढ; भोंदू खरात नक्की कोणते द्रव पाजायचा?
2
ओपेक'मध्ये फूट! सौदीशी पंगा आणि इराणचा धोका; संयुक्त अरब अमिरातीने का सोडली जगाची 'तेल संघटना'?
3
उष्णतेचा दुहेरी तडाखा! दिवस आणि रात्रीही लाहीलाही; हवामान विभागाने दिला मोठा इशारा
4
डिजिटल पेमेंट, ट्रान्झॅक्शन, म्युच्युअल फंड.., १ मे पासून काय काय बदलणार? तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम
5
मतदार छाननीत गडचिरोलीची आघाडी; मुंबईसह पुणे, ठाणे, नागपूर पिछाडीवर
6
तुमच्याकडे राजकीय इच्छाशक्तीचा अभाव; फेरीवाल्यांच्या अतिक्रमणावरून हायकोर्टाचे सरकारला खडे बोल
7
राशीभविष्य २९ एप्रिल २०२६: मेष, वृश्चिक राशीवर होणार धनाचा वर्षाव; कुंभ, तूळ राशीसाठी आजचा दिवस संघर्षाचा
8
प्रभागात ९७ टक्के मुस्लिम मतदार, तरीही अपक्ष हिंदू महिलेने मारली बाजी, मिळवला दणदणीत विजय
9
निवडणुकीतील मतदान संपताच नागरिकांना झटका बसणार; पेट्रोल-डिझेल ५ रुपयांनी महागण्याची शक्यता
10
जर्मनीत अंतराळवीरांना १०० दिवसांचा एकांतवास! त्यांनी काही मोठा गुन्हा केला आहे का?
11
CSK फ्रँचायझीकडून MI विरुद्ध केला होता मोठा पराक्रम! तोच Donovan Ferreira झाला RR चा 'बाहुबली'
12
बापरे, हा काय प्रकार! हाय हिल्स घालून अक्षय कुमारचा 'लालपरी' गाण्यावर डान्स, व्हिडीओ व्हायरल
13
मिरा रोडमध्ये धर्म विचारून केला चाकू हल्ला; आराेपी जैब अन्सारी ‘लोन वुल्फ’ असण्याची शक्यता
14
विमान सेवा बंद पडण्याची भीती, कंपन्यांचे केंद्राला मदतीचे साकडे; खर्च दुप्पटीनं वाढला
15
महायुतीतील वाद उफाळला! गोकुळ दूध संघावर प्रशासक येणार; शिंदे-फडणवीस यांच्यात मतभेद?
16
१ मेपासून मराठी भाषा तपासणी मोहीम राबविणार; रिक्षा-टॅक्सीचालकांवर १५ ऑगस्टपर्यंत कारवाई नाही
17
‘आरटीईनुसार विद्यार्थी प्रवेश बंधनकारक’; सुप्रीम कोर्टाने खासगी शाळांना बजावले
18
भीषण गर्मीत मोठे वीज संकट; मागणी विक्रमी, उत्पादन निम्म्यापेक्षा कमी, नागरिक हैराण
19
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
20
जांभळाला सोन्याचा भाव, किरकोळमध्ये ५०० रुपये किलो; ३०० ते ४०० रुपयांचा घाऊक बाजारात भाव
Daily Top 2Weekly Top 5

महिला गटात पुण्याने राखले विजेतेपद

By admin | Updated: December 26, 2014 01:52 IST

पुण्याच्या स्नेहल शिंदे व लविना गायकवाड व आम्रपाली गलांडे यांच्या चौफेर चढाया आणि सायली केरीपाळे व किशोरी शिंदेच्या अफलातून

पुणे : पुण्याच्या स्नेहल शिंदे व लविना गायकवाड व आम्रपाली गलांडे यांच्या चौफेर चढाया आणि सायली केरीपाळे व किशोरी शिंदेच्या अफलातून पकडींमुळे पुणे जिल्हा संघाने मुंबई उपनगर संघाचा पराभव करून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेत ९व्यांदा विजेतेपद राखत पार्वतीबाई सांडव चषक जिंकला. पुरुष गटात मुंबई उपनगरने पुण्याचा पराभव करून विजेतेपदासह श्रीकृष्ण करंडक जिंकला. धनकवडी येथे तीन हत्ती चौकातील क्रीडांगणावर संपलेल्या या स्पर्धेतील महिलांच्या अंतिम लढतीत पुणे संघाने मुंबई उपनगर संघाचा ३५ -२० असा दणदणीत पराभव केला. पुण्याच्या स्नेहल शिंदे, लविना गायकवाड आणि आम्रपाली गलांडे यांच्या चौफेर चढायांपुढे मुंबई संघाच्या खेळाडू टिकाव धरू शकल्या नाहीत. पुणे संघाने संपूर्ण सामन्यात ४ बोनस व गुण वसूल करीत उपनगर संघावर १ लोणही चढवला. मुंबई उपनगरच्या आश्विनी शेवाळे हिने खोलवर चढाया करून प्रतिकार केला. तिला राजश्री पवार हिने उत्कृष्ट साथ मिळाली; मात्र त्या आपल्या संघाला विजय मिळवून देऊ शकल्या नाहीत. पुरुष विभागात मुंबई उपनगर संघाने पुणे जिल्हा संघाचा १७-११ गुणांनी पराभव करीत विजेतेपद जिंकले. मुंबई उपनगरच्या रिशांक देवाडीगा व नीलेश शिंदे या अनुभवी खेळाडंूनी पुण्याच्या खेळाडूंचे सर्व डावपेच उधळून लावले. उपनगरच्या रिशांक देवाडीगा याने जोरदार चढाया करीत पुणे संघावर दबाव वाढविला. या जाळ्यात पुण्याचा संघ नेमका अडकत एक-एक गडी बाद होत गेला. त्यामुळे उपनगरला हा सामना जिंकणे सोपे गेले. पुण्याच्या अक्षय जाधव याने काहीसा प्रतिकार केला; मात्र तो तोकडा पडला. (क्रीडा प्रतिनिधी)