ट्रम्प यांना फिफा विश्वचषक, ऑलिम्पिकपासून ‘वाडा’ रोखणार? वाडाला ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा अधिकार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 06:14 IST2026-03-18T06:13:24+5:302026-03-18T06:14:03+5:30

२०२७ चा फुटबॉल विश्वचषक, २०२८ ला लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ ला हिवाळी ऑलिम्पिक अमेरिकेत होत आहेत. ट्रम्प यांच्याआधीचे ज्यो बायडेन प्रशासन आणि अमेरिकेची डोपिंगविरोधी संस्था वाडाच्या विरोधात राहिली आहे.

Will Wada block Trump from FIFA World Cup Olympics Does Wada have the right to ban Trump | ट्रम्प यांना फिफा विश्वचषक, ऑलिम्पिकपासून ‘वाडा’ रोखणार? वाडाला ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा अधिकार?

ट्रम्प यांना फिफा विश्वचषक, ऑलिम्पिकपासून ‘वाडा’ रोखणार? वाडाला ट्रम्प यांच्यावर बंदी घालण्याचा अधिकार?

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना अमेरिकेतच आयोजित होणाऱ्या फिफा विश्वचषक, लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ च्या हिवाळी ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यास बंदीचा सामना करावा लागू शकतो. हे ऐकायला विचित्र वाटत असले तरी विश्व डोपिंगविरोधी एजन्सी (वाडा) असा नियम लागू करण्याचा विचार करीत आहे.

२०२७ चा फुटबॉल विश्वचषक, २०२८ ला लॉस एंजिलिस ऑलिम्पिक आणि २०३४ ला हिवाळी ऑलिम्पिक अमेरिकेत होत आहेत. ट्रम्प यांच्याआधीचे ज्यो बायडेन प्रशासन आणि अमेरिकेची डोपिंगविरोधी संस्था वाडाच्या विरोधात राहिली आहे.

मंगळवारी वाडाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत हा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. वादाच्या केंद्रस्थानी असलेला विषय म्हणजे अमेरिकेने २०२४ आणि २०२५ चे ७.३ दशलक्ष डॉलरचे वार्षिक शुल्क वाडाकडे जमा केलेले नाही. चीनचे जलतरणपटू अमली द्रव्य सेवनात पॉझिटिव्ह आढळूनही त्यांना स्पर्धेत भाग घेण्याची परवानगी देण्यात आली होती. वाडाच्या भूमिकेचा विरोध म्हणून अमेरिकेने शुल्क रोखून ठेवले. वाडाचे प्रवक्ते जेम्स फिट्झगेराल्ड यांच्यानुसार, हा नियम पारित झाल्यास तो अमेरिकेसाठी घातक ठरणार आहे.

ट्रम्प यांना त्यांच्याच देशात रोखले जाईल?
बायडेन प्रशासनात डोपिंग प्रकरणांचे प्रमुख राहिलेले राहुल गुप्ता आणि त्यांची उत्तराधिकारी सारा कार्टर यांनी हा प्रस्ताव ‘हास्यास्पद’ ठरविला. गुप्ता म्हणाले, ‘ही सरकारची जबाबदारी आहे, वाडाची नाही. वाडा अशा नियमांद्वारे कोणत्याही सरकारच्या, विशेषतः यजमान देशाच्या कामकाजात हस्तक्षेप करीत असल्याचे दिसते. हे कोणत्याही सरकारसाठी चिंतेचे कारण ठरू शकते.’

वाडाला ट्रम्पवर बंदी घालण्याचा अधिकार?
ऑलिम्पिक आणि विश्वचषकासारख्या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व संबंधितांना वाडाच्या नियमांचे पालन करण्याची अट मान्य करावी लागते. हे नियम डोपिंगशी संबंधित असोत किंवा प्रशासकीय बाबींशी संबंधित असोत. युनेस्कोसोबतच्या करारानुसार सरकारांना वाडाचे नियम पाळणे बंधनकारक आहे. या करारात शुल्क भरणे आणि नियमांचे पालन करणे याचा समावेश आहे.

Web Title : क्या वाडा ट्रम्प को फीफा विश्व कप, ओलंपिक से प्रतिबंधित कर सकता है?

Web Summary : वाडा बकाया राशि के कारण ट्रम्प और अधिकारियों को अमेरिका में आयोजित होने वाले कार्यक्रमों से प्रतिबंधित करने पर विचार कर रहा है। चीनी तैराकों के डोपिंग पर वाडा के रुख का अमेरिकी विरोध एक कारक है। यह प्रस्ताव विवादास्पद है, जिससे सरकारों, विशेषकर मेजबान देशों के मामलों में वाडा की अत्यधिक दखलअंदाजी को लेकर चिंताएं बढ़ रही हैं।

Web Title : Could WADA Ban Trump from FIFA World Cup, Olympics?

Web Summary : WADA considers banning Trump, officials from US-hosted events over unpaid dues. US opposition to WADA's stance on Chinese swimmers' doping is a factor. The proposal is controversial, raising concerns about WADA's overreach into government affairs, especially of host nations.