ऑलिम्पिक पदक जिंकून निवृत्त होईन : लिएंडर पेस
By Admin | Updated: September 16, 2014 01:43 IST2014-09-16T01:43:23+5:302014-09-16T01:43:23+5:30
महान फुटबॉलपटू मोहम्मद अली आणि पेले यशोशिखरावर असताना त्यांनी क्रीडा क्षेत्रला अलविदा केले. मलादेखील अशीच निवृत्ती हवी असल्याचे मत भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्तकेले आहे.

ऑलिम्पिक पदक जिंकून निवृत्त होईन : लिएंडर पेस
बंगलोर : महान फुटबॉलपटू मोहम्मद अली आणि पेले यशोशिखरावर असताना त्यांनी क्रीडा क्षेत्रला अलविदा केले. मलादेखील अशीच निवृत्ती हवी असल्याचे मत भारताचा अव्वल टेनिसपटू लिएंडर पेस याने व्यक्तकेले आहे. पूर्वीच्या तुलनेत अधिक तंदुरुस्त आणि ताजातवाना वाटणारा 41 वर्षाचा लिएंडर म्हणाला, ‘रियो ऑलिम्पिकचे पदक जिंकून निवृत्त होणो मी पसंत करेन.’
लिएंडर म्हणाला, ‘रियो ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकल्यानंतर मला खेळात यशाच्या शिखरावर पोहोचल्याचे समाधान होईल आणि निवृत्त होताना आनंद वाटेल. मी मोहम्मद अली यांना नेहमी आदर्श मानत आलो आहे. यशाच्या अत्युच्य शिखरावर असताना जे निवृत्त झालेत त्यात पेले, मायकेल जॉर्डन, कार्ल लुईस, रॉड लावेर यांचा उल्लेख होतो.’
ऑलिम्पिकचे कांस्य आणि 14 ग्रँडस्लॅम जेतेपदाचा मानकरी असलेल्या पेसच्या मते, ‘खेळातील वेगवानपणा आणि प्रत्युत्तर देण्यासाठी लागणारे बळ अंगी असावे यासाठी मी जखमांपासून दूर राहण्यावर भर देतो. मांसपेशी सळसळत्या रहाव्यात याकडे लक्ष असते. या खेळात तुम्ही आवश्यकतेपेक्षा अधिक ताकदवान आणि कमी लवचिक असलेले चालत नाही. टेनिसमध्ये लवचिकता सर्वात मोलाची ठरते.’
पेसने यंदा सर्वात कठीण काळ पाहिला. त्याला मुलीच्या पालनपोषणासाठी पत्नी रिया पिल्लई हिच्यासोबत कायदेशीर लढाई लढावी लागली. याचा खेळावर परिणाम झाला का, असे विचारताच तो इतकेच म्हणाला, ‘खूप मोठा परिणाम झाला.’
4तुझी आठ वर्षाची मुलगी आयना आई-वडिलांदरम्यान सुरू असलेल्या वादाबाबत काय म्हणते, असे विचारताच पेस थांबला; पण एक जबाबदार चिंताग्रस्त वडिलांचे भाव त्याच्या चेह:यावर जाणवत होते.
4तो म्हणाला, ‘मी जबाबदार पिता आहे. मुलगी सुरक्षित असावी यासाठी नेहमी धडपडत असतो. सोबत टेनिसप्रति समर्पित असतो. या कठीणसमयी माङो आईवडील माङयासोबत आहेत याबद्दल स्वत:ला नशीबवान मानतो. त्यांचा पाठिंबा आहे.
4 गेल्या 23 वर्षापासून टेनिसमध्ये सहकार्य करणारी टीम आहे. माझी मुलगी आणि माङयात प्रामाणिक नाते आहे. ती मोठी होत असताना तिला मार्गदर्शनाची गरज आहे. वडिलांच्या आणि सभोवताल असलेल्या व्यक्तींच्या सान्निध्यात तिने आपला दिवस मजेत घालवावा, असे मला रोज वाटत असते.’