फ्रेंच ओपनसह अनेक स्पर्धांमध्ये खेळणार नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2020 02:46 AM2020-02-21T02:46:33+5:302020-02-21T02:47:09+5:30

रॉजर फेडरर : गुडघा दुखापतीचा बसला फटका; सोशल मीडियावरुन दिली माहिती

Will not play in many competitions, including the French Open | फ्रेंच ओपनसह अनेक स्पर्धांमध्ये खेळणार नाही

फ्रेंच ओपनसह अनेक स्पर्धांमध्ये खेळणार नाही

Next

पॅरिस : प्रदीर्घ कालावधीपासून गुडघ्याच्या दुखापतीला सामोरे जात असलेल्या टेनिससम्राट रॉजर फेडरर याने अखेर आपल्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घेतली. यानंतर गुरुवारी स्वित्झर्लंडच्या या दिग्गज खेळाडूने, ‘आपण आगामी फ्रेंच ओपन ग्रँडस्लॅम स्पर्धेत खेळणार नाही,’ असेही जाहीर केले. केवळ फ्रेंच ओपनच नाही, तर दुखापतीतून पूर्णपणे सावरण्यासाठी अनेक स्पर्धांमध्ये फेडरर सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट झाले. २० ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलेल्या फेडररने आपल्या फेसबुक अकाउंटद्वारे माहिती दिली.

बुधवारी स्वित्झर्लंडमध्येच फेडररच्या दुखापतीवर शस्त्रक्रिया करण्यात आली असून २४ मे ते ७ जूनदरम्यान रंगणाऱ्या फ्रेंच ओपन स्पर्धेसह अनेक स्पर्धांमध्ये त्याचा सहभाग नसेल. त्याने शस्त्रक्रियेची माहिती देताना सांगितले की, ‘यामुळे मी दुबई, इंडियन वेल्स, बोगोटा, मियामी आणि फ्रेंच ओपन स्पर्धा खेळू शकणार नाही.’ त्याचप्रमाणे, ‘शस्त्रक्रिया टाळण्याचा माझा पूर्ण प्रयत्न होता, मात्र खूप प्रयत्न केल्यानंतर गुडघादुखीचा त्रास दूर होत नव्हता,’ असेही फेडररने म्हटले.
 

Web Title: Will not play in many competitions, including the French Open

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Tennisटेनिस