शहरं
Join us  
Trending Stories
1
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
2
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
3
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
4
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
5
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
6
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
7
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
8
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील
9
गृहकर्ज थकबाकी वाढली १० लाख कोटी रुपयांनी; रिझर्व्ह बँकेच्या अहवालातून उघडकीस
10
मराठी मते भाजपच्या पारड्यात की काँग्रेसच्या? दोन्ही उमेदवारांना लोकसभा निवडणूक लढवण्याचा अनुभव नाही
11
रशिया अण्वस्त्रांसह लष्करी सराव करणार; अमेरिकेसह पश्चिमी देशांना दिला इशारा
12
...जेव्हा मगरीने भरलेल्या तुडुंब नदीत आईनेच मुलाला फेकून दिले
13
सरकारच्या अनुदानामुळे १५ लाख ईव्हींची विक्री; फेम-२ योजनेतील ९० टक्के निधीचा पाच वर्षांत विनियोग
14
न होणाऱ्या प्रवासाची तिकिटे विकली प्रवाशांना; विमान कंपनीला ७.९ कोटी डॉलरचा दंड
15
ऑर्डर्स वाढल्या, नोकऱ्या मिळाल्या; सेवा क्षेत्रात तेजीचा १४ वर्षांचा उच्चांक, खासगी क्षेत्राचाही विस्तार
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

लाज वाटायला हवी; भारतीय खेळाडूच्या आजीचं निधन अन् नेटिझन्सकडून वर्णद्वेषी टीका!

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 1:49 PM

कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण, त्याचा राग भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर ( Jwala Gutta) काढला गेल्याच्या अनेक घटना घडल्या.

कोरोना व्हायरसमुळे चीनबद्दल जगभरात संताप व्यक्त केला जात आहे. पण, त्याचा राग भारताची महिला बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टावर ( Jwala Gutta) काढला गेल्याच्या अनेक घटना घडल्या. भारताची दुहेरीतील स्टार खेळाडू ज्वालानंही तिच्या स्वभावानुरूप नेटिझन्सना सडेतोड उत्तर दिले. पण, आता ट्रोलर्सनी हद्दच केली. ज्वाला गुट्टानं तिच्या आजीच्या निधनाची ( grand mom who passed away) बातमी सोशल मीडियावर पोस्ट केली. पण, तिला काही नेटिझन्सनी ट्रोल केलं आणि त्यावर ज्वालानं सहानुभूती कुठेय? असा सवाल विचारत राग व्यक्त केला. चेन्नईतील पराभवासाठी BCCI ने 'या' व्यक्तीला दिली शिक्षा; संघानंही केलेली तक्रार

ज्वालानं ट्विट केलं की,''माझ्या आजीचं चीनमध्ये निधन झालं. माझी आई प्रत्येक महिन्याला तिला भेटायला जाते, परंतु कोव्हिडमुळे गेले वर्षभर तिला जाता आलं नाही. आपल्या जवळच्या व्यक्तिंसोबत घालवलेला वर्तमान किती महत्त्वाचे आहे, हे या कोव्हिडनं आपल्याला शिकवलं.''  हरणार नाही, लढणार!; ८ वर्ष थांबलो, त्यात आणखी एक वर्ष; एस श्रीसंत प्रचंड नाराज ज्वालानं या पोस्टमध्ये कोव्हिड असा उल्लेख केल्यानं काहींनी तिला कोव्हिड की चायनीस व्हायरस? असा सवाल विचारला. ज्वालानं एका ट्विटचं स्क्रीनशॉट पोस्ट करून वर्णद्वेषी टीकेबद्दल सांगितले.   तिनं लिहिलं की,''माझ्या आजीच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करत असताना माझ्यावर वर्णद्वेषी टीका होताना पाहून मला धक्काच बसला. या समाजात काय चाललं आहे. सहानुभूती कुठे हरवली आहे, आपण कोणत्या दिशेनं जात आहोत?, लाज वाटायला हवी.''  BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

टॅग्स :BadmintonBadmintoncorona virusकोरोना वायरस बातम्याchinaचीन