BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही चाचणी अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.

By स्वदेश घाणेकर | Published: February 12, 2021 11:25 AM2021-02-12T11:25:44+5:302021-02-12T11:28:06+5:30

whatsapp join usJoin us
Sanju Samson among 6 players to fail BCCI's new 2-km run fitness test, to be given another chance: Report | BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

BCCIच्या 2km धावण्याच्या परीक्षेत सहा भारतीय नापास; वन डे मालिकेसाठी संघातील स्थान अडचणीत?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext
ठळक मुद्दे२km चाचणीनंतर इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-20 व वन डे मालिकेसाठी होणार संघ निवडफलंदाज, यष्टिरक्षक किंवा फिरकी गोलंदाज यांना ८ मिनिटे ३० सेकंदात दोन किलोमीटरचं अतंर पार करावे लागते

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( BCCI) खेळाडूंच्या फिटनेससाठी नवीन परीक्षा घेण्यास सुरुवात केली आहे. Yo-Yo टेस्टशिवाय भारतीय खेळाडूंना २ किलोमीटर धावण्याच्या परीक्षेलाही सामोरे जावे लागत आहे. टीम इंडियातील बरेच वरिष्ठ खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठीच्या संघात आहेत. त्यामुळे त्यांना सध्यातरी या परिक्षेला सामोरे जावे लागणार नाही. पण, कनिष्ठ स्थरावर घेण्यात आलेल्या पहिल्या चाचणीत सह खेळाडू नापास झाल्याचे वृत्त समोर येत आहे. त्यामुळे इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीच्या संघ निवडीत विलंब होत आहे. या नापास झालेल्या खेळाडूंमध्ये संजू सॅमसन ( Sanju Samson) याचे नाव आहे.  कुलदीप यादवला संधी नाहीच, 'या' खेळाडूचे पदार्पण; जाणून घ्या टीम इंडियाची Playing XI!

संजू सॅमसन, राहुल टेवाटिया, नितीश राणा, सिद्धार्थ कौल, इशान किशन आदी ( Sanju Samson, Rahul Tewatia, Nitish Rana, Siddarth Kaul, Ishan Kishan) खेळाडूंनी ही परीक्षा दिली आणि त्यापैकी सहा खेळाडू नापास झाल्याचे वृत्त आहे.  BCCI या खेळाडूंना पुन्हा संधी देणार आहे, परंतु दुसऱ्या संधीतही ते अपयशी ठरल्यास त्यांचे संघ निवडीसाठीचे स्थान धोक्यात येणार आहे. ''फिटनेस टेस्टची ही नवीन पद्धत आहे. या खेळाडूंना दुसरी संधी दिली जाईल. काही दिवसांच्या विश्रांतीनंतर दुसरी चाचणी घेतली जाईल. दरम्यान, यातही ते अपयशी ठरल्यास इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेसाठीच्या संघ निवडीत त्यांचा विचार होण्याची शक्यता कमी आहे,''असे सूत्रांनी Times of India ला सांगितले. IPL 2021 Acution list : २९२ खेळाडू, ६१ जागा अन् आयपीएल फ्रँचायझींकडून १९६.६ कोटींचा पाऊस!

Yo-Yo टेस्ट जेव्हा पहिल्यांदा घेण्यात आली, तेव्हा  मोहम्मद शमी व अंबाती रायुडू हेही नापास झाले होते. त्यानंतर त्यांनी तंदुरुस्तीत सुधारणा केली आणि Yo-Yo टेस्ट पास केली. 2 km धावण्याच्या परीक्षेत नापास होणाऱ्या सहा खेळाडूंमध्ये संजू सॅमसन एक आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरील ट्वेंटी-२० संघाचा तो सदस्य होता. IPL 2021 Acution list : अर्जुन तेंडुलकरच्या नावाला होकार, पण एस श्रीसंत याला नकार; जाणून घ्या नेमका प्रकार!

फलंदाज, यष्टिरक्षक किंवा फिरकी गोलंदाज यांना ८ मिनिटे ३० सेकंदात दोन किलोमीटरचं अतंर पार करावे लागत आहे. तर जलदगती गोलंदाजाला ८ मिनिटे व १५ सेकंदाची वेळ आहे. पहिल्या चाचणीत नापास झालेल्या सहा खेळाडूंनी थोडक्यात संधी गमावली. टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली व मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी ही चाचणी अनिवार्य असल्याचे सांगितले आहे.  

Web Title: Sanju Samson among 6 players to fail BCCI's new 2-km run fitness test, to be given another chance: Report

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.