कोल्हापूर : बीसीसीआयतर्फे नागालॅड येथे झालेल्या वरिष्ठ आंतरविभागीय महिला टी-२० ट्रॉफी स्पर्धेत पश्चिम विभाग महिला संघाने उत्तर विभाग महिला संघाला २५ धावांनी मात करुन अजिंक्यपद पटकाविले.कोल्हापूरची अनुजा पाटील हिच्या नेतृत्वाखाली संघाने विजेतेपद पटकाविले. पश्चिम विभाग महिला संघाने पाच पैकी चार सामन्यांत विजय मिळवून अंतिम फेरीत प्रवेश मिळविला. अंतिम सामन्यात पश्चिम विभागाने उत्तर विभाग महिला संघाविरुद्ध प्रथम फलदांजी करताना २० षटकांत ४ बाद १६९ धावा केल्या. त्यात हुमारिया काझी ५८, तेजल हसबनीस ४३, किरण नवगिरे ३४ आणि कर्णधार अनुजा पाटीलने २२ धावा केल्या.उत्तरादाखल खेळताना उत्तर विभाग महिला संघाने २० षटकांत ४ बाद १४४ धावा केल्या. पश्चिम संघाकडून अनुजा पाटील, सीमा ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी घेतला. पश्चिम संघाने २५ धावांनी विजय मिळविला.स्पर्धेत अनुजाने अष्टपैलू कामगिरी केली. अंतिम फेरीपूर्वी झालेल्या सामन्यात तिने ११८ धावा आणि ११ बळी घेतले. या हंगामात डब्लूएमपीएल, वरिष्ठ महिला टी-२० आणि वरिष्ठ महिला आंतर विभागीय टी-२० या तिन्ही स्पर्धेचे अजिंक्यपद पटकाविले आहे.
Web Summary : West Zone women clinched the T20 title, defeating North Zone by 25 runs. Captain Anuja Patil's leadership and all-round performance, including 22 runs and a wicket in the final, led the team to victory after winning four of five matches. Patil also scored 118 runs and took 11 wickets in earlier matches.
Web Summary : पश्चिम क्षेत्र की महिलाओं ने 25 रनों से उत्तर क्षेत्र को हराकर टी20 ट्रॉफी जीती। कप्तान अनुजा पाटिल के नेतृत्व और हरफनमौला प्रदर्शन, जिसमें फाइनल में 22 रन और एक विकेट शामिल है, ने पांच में से चार मैच जीतने के बाद टीम को जीत दिलाई। पाटिल ने पहले मैचों में 118 रन बनाए और 11 विकेट लिए।