शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विंडीज क्रिकेट मंडळ आपली बाजू मांडणार

By admin | Updated: October 23, 2014 00:24 IST

बुधवारी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाची (डब्ल्यूसीबी) आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली होती़

बार्बाडोस : वेस्ट इंडीज क्रिकेट संघ भारत दौरा मध्येच सोडून मायदेशी परतल्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळासोबतचे (डब्ल्यूसीबी) संबंध संपुष्टात आणण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर विंडीज मंडळ बीसीसीआय अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपली बाजू मांडण्याची शक्यता आहे़बुधवारी वेस्ट इंडीज क्रिकेट मंडळाची (डब्ल्यूसीबी) आपत्कालीन बैठक बोलाविण्यात आली होती़ या बैठकीत भारत दौरा मध्येच रद्द झाल्यामुळे विंडीज मंडळाने खेद व्यक्त केला आहे़ तसेच प्रकरणाची पुन्हा एकदा समीक्षा केली जाईल, असेही स्पष्ट केले आहे़ विंडीज मंडळाने पुढे सांगितले की, विंडीज आणि बीसीसीआयचे अनेक वर्षांपासून चांगले संबंध राहिले आहेत़ त्यामुळे आम्ही या प्रकरणी बीसीसीआयशी चर्चा करण्यास इच्छुक आहोत़ कारण दौरा रद्द झाल्यामुळे बीसीसीआयचे थोडेफार नुकसान झाले असले तरी विंडीज मंडळाला याचा खूप मोठा फटका बसू शकतो़ दरम्यान, संघातील खेळाडू आणि वेस्ट इंडीज प्लेयर्स संघटना (डब्ल्यूआयपीए) यांच्यात सुरू असलेला वाद दूर करण्यासाठी विंडीज मंडळाने एक समिती नेमण्याचा निर्णय घेतला आहे़ ही समिती दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर आपला अंतिम अहवाल देणार आहे़ डब्ल्यूसीबीच्या बैठकीत वेस्ट इंडीज खेळाडूंविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे; मात्र काय कारवाई होईल, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही़ (वृत्तसंस्था)