शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

स्टार खेळाडूच्या फेरारी कारचा अपघात! एक तास पडला अडकून, अखेर हेलिकॉप्टरने नेलं रुग्णालयात

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 10, 2024 21:39 IST

Michail Antonio Ferrari Car Accident: निर्जन अशा जंगलात अपघात झाल्याने बराचवेळ कुणाला याबद्दल कळू शकलं नाही

Michail Antonio Ferrari Car Accident : भारतीय क्रिकेटपटू रिषभ पंत दिल्लीहून डेहराडूनला जात असताना त्याचा भीषण कारअपघात झाला होता. त्यात तो गंभीर जखमी झाला होता. या अपघातात पंतच्या गुडघ्याचे लिगामेंट तुटले. त्यानंतर पंतच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्याला एक वर्षाहून अधिक काळ क्रिकेटपासून दूर राहावे लागले. ही घटना साऱ्यांच्याच अंगावर काटा आणते. आताही अशीच एक घटना एका स्टार खेळाडूसोबत घडली आहे. प्रीमियर लीग फुटबॉल स्टार मायकेल अँटोनियोता एक भयानक कार अपघात झाला आहे, ज्यामध्ये त्याच्या कारचा पुढचा भाग निखळून पडला आणि तो गंभीर जखमी झाला.

मायकेल अँटोनियोचा जीव थोडक्यात वाचला

शनिवारी, ७ डिसेंबर रोजी हा अपघात झाला. कार अपघातात जखमी झालेल्या स्टार मायकेल अँटोनियोची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्याला मध्य लंडनमधील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका वृत्तानुसार, मायकेल अँटोनियोच्या कारला एपिंग फॉरेस्ट भागाच्या काठावर कोपिस रो येथे अपघात झाला. त्याची कार एका झाडाला धडकली, त्यानंतर तो कारच्या आत अडकून राहिला. अँटोनियो एक तासाहून अधिक काळ कारमध्ये अडकून पडला होता. त्यानंतर एका व्यक्तीने त्याला पाहिले आणि अपघाताची माहिती हेल्पलाइनवर कळवली. त्यानंतर त्याना हेलिकॉप्टरने रुग्णालयात नेण्यात आले.

शरीराच्या कमरेखालील भागात अनेक फ्रॅक्चर

या अपघातात मायकेल अँटोनियो याच्या शरीराच्या खालच्या भागात अनेक फ्रॅक्चर झाले आहेत. त्यामुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. सध्या तो रुग्णालयात डॉक्टरांच्या देखरेखीखाली आहे. अँटोनियो प्रीमियर लीगमध्ये वेस्ट हॅमकडून खेळतो. मायकेल अँटोनियोच्या तब्येतीबद्दल अपडेट देताना, वेस्ट हॅमने एका निवेदनात म्हटले आहे की, 'वेस्ट हॅम युनायटेड पुष्टी करते की शनिवारी दुपारी रस्ते अपघातानंतर मायकेल अँटोनियोच्या शरीराच्या खालच्या भागात शस्त्रक्रिया झाली आहे. येत्या काही दिवसांत त्याच्यावर रुग्णालयात देखरेख ठेवण्यात येणार आहे.

२०१५ पासून मायकेल अँटोनियो वेस्ट हॅम संघाचा भाग

लंडनमध्ये जन्मलेला जमैकन खेळाडू मायकल अँटोनियो २०१५ मध्ये वेस्ट हॅमकडून खेळत होता. त्याने या क्लबसाठी ३२३ सामन्यांत ८३ गोल केले. मायकेल अँटोनियोने ताज्या हंगामात १५ सामन्यांत एकदाच गोल केला आहे. त्यात घरच्या मैदानावर इप्सविच विरुद्ध त्याच्या संघाला ४-१ असा विजय मिळाला होता.

टॅग्स :AccidentअपघातFerrariफेरारीcarकारFootballफुटबॉलRishabh Pantरिषभ पंत