शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरेंच्या 13 पैकी 5-6 आमदार शिंदेंच्या संपर्कात, खासदारही; फसलेल्या सभेवरून किरण सामंतांचा दावा
2
नाशिकमध्ये महायुतीचा उमेदवार ठरला? शांतीगिरी महाराजांच्या अर्जावर शिंदे शिवसेना असा उल्लेख, अर्ज भरला
3
'मोदी तुमच्या आरक्षणाचे रक्षण करेल; सर्वाधिक ST खासदार भाजपचे', PM मोदींची काँग्रेसवर टीका
4
'घरच्यांना सांग सुखरुप निघालो', राज ठाकरे संकर्षणला असं का म्हणाले? 'त्या' कवितेनंतर घेतली भेट
5
Ana Brumwell Photos: कोण आहे RCBचा शतकवीर Will Jacksची गर्लफ्रेंड अ‍ॅना ब्रुमवेल? जाणून घ्या या सौंदर्यवतीबद्दल
6
आता कळेलच की जनता कोणासोबत, असली कोण आणि नकली कोण; गजानन कीर्तीकरांचे वक्तव्य
7
“औरंगजेब-याकुबचा उदो उदो करण्यापेक्षा रामराम करणे कधीही चांगले”; बावनकुळेंची ठाकरेंवर टीका
8
Rahul Gandhi : "कोणत्याही महिलेला मंगळसूत्र गहाण ठेवावं लागणार नाही"; राहुल गांधींचं 25 लाखांचं आश्वासन
9
आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच व्यक्त झाली क्षिती जोग, म्हणाली, "मला आनंद झाला..."
10
"मोदींनी छत्रपतींचे विचार आत्मसात केले", उदयनराजेंनी सांगितलं 'पॉलिवूड', मोठ्या चुकीची कबुली
11
काँग्रेसला दुसरा धक्का: उमेदवाराने ऐनवेळी अर्ज मागे घेत भाजपमध्ये केला प्रवेश
12
“देशात परिस्थिती बदलली, भाजपाविरोधी लाट, महायुती अडचणीत”: बाळासाहेब थोरात
13
Shiv Puja: महादेवाला नेहमी बेल आणि पांढरे फुल वाहावे, पण केतकीचे फुल कदापि नाही; वाचा कारण!
14
VIDEO: मुलाने १५ सेकंदात वडिलांना २५ बुक्के मारले; हार्ट अटॅकने जन्मदात्याचा मृत्यू
15
Vastu Tips: जिथे कमळ फुलते तिथे सौभाग्यलक्ष्मी नांदते; पहा चुंबकाप्रमाणे पैसा आकर्षून घेणारी रोपं!
16
Mumbai Local News BREAKING: हार्बर रेल्वे ठप्प! सीएसएमटी स्थानकाजवळ लोकलचा डबा घसरला, प्रवाशांची तारांबळ
17
PM कुणीही असला तरी भारतीय अर्थव्यवस्था..., मोदींनी फुकट बढाया मारू नयेत, चिदंबरम यांचा टोला
18
अखेर इस्रायल-हमास भीषण युद्ध संपणार? तीन देशांच्या प्रयत्नानंतर आज महत्त्वाची घोषणा होण्याची शक्यता
19
नारायण राणे जिंकले नाहीत तर प्रचार कायमचा सोडणार; कट्टर राणे समर्थकाने घेतली शपथ, केला मताधिक्याचा दावा
20
चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेला प्रारंभ 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 05, 2019 6:26 PM

पाच राज्यांतील ६१ विद्यापीठांचे संघ, ७०० खेळाडूंचा सहभाग

ठळक मुद्देपोलीस आयुक्तांच्या हस्ते उद्घाटन

अमरावती : पश्चिम विभाग आंतरविद्यापीठ महिला कबड्डी स्पर्धेला संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या क्रीडा संकुलावर गुरुवारी प्रारंभ झाला. शहर पोलीस आयुक्त संजय बाविस्कर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन झाले. महाराष्ट्र, गोवा, राजस्थान, मध्य प्रदेश व गुजरात या राज्यांतील ६१ विद्यापीठांच्या संघांतील ७०० खेळाडू या स्पर्धेत ९ डिसेंबरपर्यंत अजिंक्यपदासाठी झुंज देणार आहेत. स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू मुरलीधर चांदेकर होते. मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य प्रदीप खेडकर, मीनल ठाकरे, कुलसचिव तुषार देशमुख, विदर्भ कबड्डी फेडरेशनचे सदस्य सतीश डफळे, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक अविनाश असनारे, क्रीडा व शारीरिक मंडळाचे सदस्य प्रमोद चांदूरकर उपस्थित होते.मैदानाच्या पूजनानंतर उद्घाटनपर भाषणात पोलीस आयुक्त बाविस्कर यांनी सर्व खेळाडू शिस्तीत आपल्या नैसर्गिक खेळाचे प्रदर्शन करतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी मनाचा निश्चय, सामूहिक प्रयत्न यामुळे नकारात्मकता दूर होऊन स्वत:ला जिंकण्याच्या भावनेने हा खेळ प्रत्येकाला प्रेरणा देत असल्याचे सांगितले. याप्रसंगी प्रदीप खेडकर, मीनल ठाकरे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय अविनाश असनारे यांनी दिला. स्वागतपर भाषण कुलसचिव तुषार देशमुख यांनी केले. संचालन विजय पांडे यांनी केले. उद्घाटन समारंभाला सर्व खेळाडू, संघाचे प्रशिक्षक, व्यवस्थापक, निरीक्षक, विविध समित्यांचे सभासद, क्रीडा संचालक, क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.

टॅग्स :Kabaddiकबड्डीAmravatiअमरावती