Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2020 03:01 PM2020-08-21T15:01:00+5:302020-08-21T15:11:24+5:30

200पेक्षा अधिक वेगानं धावणाऱ्या बाईक्सवरील स्वार चालकाचा तोल गेला आणि एखादा फुटबॉलप्रमाणे बाईक उसळी घेत पुढे गेली.

Watch horror 200mph crash as MotoGP riders collide at Austrian GP and flying bikes miss Valentino Rossi by inches | Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्... 

Video: खतरनाक अपघात; बाईक्सचे झाले तुकडे तुकडे; रेसिंग सुरू असताना रायडरचा तोल गेला अन्... 

Next
ठळक मुद्दे 200पेक्षा अधिक वेगानं धावणाऱ्या बाईक्सवरील स्वार चालकाचा तोल गेला हवेत उडणारी बाईक दुसरा चालक व्हॅलेंटीनो रोसी याच्या जवळून म्हणजे इंचाच्या फरक इतकी जवळून गेली

बाईक, कार, फॉर्म्युला वन शर्यतीत अपघात होतच असतात.. पण, ऑस्ट्रेलियन ग्रांपी शर्यतीत झालेल्या अपघातानं सर्वांना काही क्षणाकरीता सुन्न केलं. 200पेक्षा अधिक वेगानं धावणाऱ्या बाईक्सवरील स्वार चालकाचा तोल गेला आणि एखादा फुटबॉलप्रमाणे बाईक उसळी घेत पुढे गेली. ती हवेत उडणारी बाईक दुसरा चालक व्हॅलेंटीनो रोसी याच्या जवळून म्हणजे इंचाच्या फरक इतकी जवळून गेली, पण, नशीब बलवत्तर होतं म्हणून रोसीनं मृत्यूला चकवलं आणि जेव्हा त्यानं अपघाताचा व्हिडीओ पाहिला तेव्हा तोही काही काळाकरीता स्तब्ध झालेला पाहायला मिळाला. 

फ्रांसो मोर्बीडेल्ली आणि जोहान झार्को यांच्या बाईक्सची ही टक्कर झाली. एका वळणावर या दोघांची बाईक्स एकमेकांच्या इतक्या नजीक आली की त्यांची टक्कर झाली. एखादा बाहुला हवेत उडावा तशी ही दोघं दुसरीकडे फेकली गेली. अपघाताचा थरार इथून सुरू झाला. अपघातातील एक बाईक्स रस्त्याच्या कडेला गेली, परंतु दुसरी बाईक चेंडू सारखी टप्पा घेत घेत पुन्हा ट्रॅकवर आली आणि त्यानंतर जे घडलं, ते थरकाप उडवणारं होतं. 

मोर्बीडेल्ली आणि झार्को यांच्या बाईक्सचा चुराडा झाला. नशीबानं या दोघांना गंभीर जखम झाली नाही. पण, यात नऊ वेळचा वर्ल्ड चॅम्पियन रोसी थोडक्यात वाचला.  


पाहा व्हिडीओ...

Web Title: Watch horror 200mph crash as MotoGP riders collide at Austrian GP and flying bikes miss Valentino Rossi by inches

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.