विश्वनाथन आनंदची विजयी सलामी
By Admin | Updated: September 16, 2014 01:40 IST2014-09-16T01:40:04+5:302014-09-16T01:40:04+5:30
2014 फिडे कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर प्रथमच क्लासिकल बुद्धिबळ खेळणा:या विश्वनाथन आनंदला सूर गवसला आहे.

विश्वनाथन आनंदची विजयी सलामी
केदार लेले - लंडन
2014 फिडे कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धा जिंकल्यानंतर प्रथमच क्लासिकल बुद्धिबळ खेळणा:या विश्वनाथन आनंदला सूर गवसला आहे. माजी विश्वविजेत्यांच्या लढतीत भारताच्या विश्वनाथन आनंद याने ‘बिल्बाव मास्टर्स बुद्धिबळ’ स्पर्धेच्या पहिल्या फेरीत रसलन पोनोमारिओवला हरवून दणक्यात सुरुवात केली.
आनंद आणि पोनोमारिओव यांच्यातील डाव ‘किंग्स इंडियन’ बचाव पद्धतीने झाला. आनंदकडे पांढरी मोहरी होती. अनुक्रमे 34 व्या, 38 व्या आणि 39 व्या खेळींवर आनंदने उत्कृष्ट चाली रचल्या. 34 व्या चालीवर आनंदने पांढ:या घरातील उंटांची अदला-बदली केली. 38 व्या चालीवर आनंदने त्याचा वजीर पटाच्या मध्यभागी (डी 5 घरात) आणत आक्रमण बळकट केले. आनंदने 43व्या खेळीवर केलेली प्याद्याची ‘ई 5’ घरातील चाल ही विजयाची नांदी होती. अखेर 61व्या चालीला पोनोमारिओवने शरणागती पत्करली आणि आनंदची सरशी झाली.
विश्वनाथन आनंद (भारत), लेवॉन अरोनियन (अर्मेनिया), वॅलेजो पॉन्स (स्पेन) आणि रसलन पोनोमारिओव (रशिया) या चार ग्रँडमास्टर्सचा सहभाग असणारी ही स्पर्धा डबल राउंड-रॉबिन पद्धतीने खेळविली जात आहे.
डबल राउंड-रॉबिन पद्धतीने खेळली जाणारी ही स्पर्धा सहा फे:यांमध्ये रंगेल. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान पहिल्या तीन फे:या होतील. त्यानंतर 18 ते 2क् सप्टेंबर दरम्यान, चार ते सहा फे:या होतील.
पहिल्या तीन फे:यानंतर 17 सप्टेंबर हा विश्रंतीचा दिवस ठेवण्यात आला आहे.
15 सप्टेंबरला दुसरी फेरी
लेवॉन अरोनियन (अर्मेनिया)विरुद्ध पोनोमारिओव (रशिया)
वॅलेजो पॉन्स (स्पेन) विरुद्ध विश्वनाथन आनंद (भारत)