शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विराटकडे ‘पूर्णवेळ’ नेतृत्व येणार

By admin | Updated: January 6, 2017 01:43 IST

इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील.

मुंबई : इंग्लंडविरुद्ध १५ जानेवारीपासून सुरू होत असलेल्या प्रत्येकी तीन वन-डे आणि टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी भारतीय निवडकर्ते आज, शुक्रवारी संघ निवड करतील. कसोटी संघाचा कर्णधार असलेल्या विराट कोहली याच्याकडे दोन्ही प्रकाराचे नेतृत्वदेखील सोपविले जाईल, हे जवळपास निश्चित मानले जात आहे.महेंद्रसिंग धोनी याने बुधवारी रात्री दोन्ही प्रकारच्या क्रिकेटचे कर्णधारपद सोडले. कोहलीकडे नेतृत्व सोपविले जाण्याबाबत कुठलीही शंका नाही; पण निवड करताना संघातील संतुलन राखण्याचे अवघड आव्हान समितीपुढे असेल. अनेक खेळाडू जखमांनी त्रस्त आहेत. मुंबईचे दोन्ही फलंदाज रोहित शर्मा व अजिंक्य रहाणे बाहेर आहेत. यामुळे खराब फॉर्मचा सामना करीत असलेल्या शिखर धवनला के. एल. राहुलसोबत सलामीला पाठविले जाऊ शकते. याशिवाय एकदम नव्या चेहऱ्यावरदेखील विश्वास टाकला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. कर्नाटकचा राहुल जखमी झाल्याने न्यूझीलंड विरुद्ध तो खेळू शकला नव्हता. धवन आॅस्ट्रेलियात अखेरचा वन-डे खेळला होता. पहिल्या दोन्ही सामन्यांत ‘फ्लॉप’ राहिल्यानंतर पुढील तीन सामन्यांत एक शतक आणि दोन अर्धशतके ठोकली होती. इंग्लंडविरुद्ध तिहेरी शतक झळकविणारा करुण नायर याला मर्यादित षटकांच्या सामन्यात संधी दिली जाईल, असे संकेत आहेत.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेत जखमी झालेला आश्विन तमिळनाडूकडून रणजी सामन्यात खेळला नव्हता. त्याच्या उपलब्धतेबाबतही अनिश्चितता आहे. अखेरच्या कसोटीत जखमी झालेला आॅफ स्पिनर जयंत यादव याचे नाव संघात येण्याआधी फिटनेस चाचणी होईल का, हे पाहणे रंजक ठरेल. मोहम्मद शमी आणि धवल कुलकर्णी हे देखील जखमी आहेत.धोनी नेतृत्वाच्या शर्यतीतून बाहेर पडला असला तरी खेळाडू म्हणून उपलब्ध असेल. रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, जसप्रीत बुमराह, उमेश यादव आणि ईशांत शर्मा यांची नावे संघात निश्चित मानली जात आहेत. हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिकेदरम्यान जखमी झाला होता. तो आता डी. वाय. पाटील टी-२० स्पर्धेत खेळत आहे. त्यालादेखील संघात स्थान मिळू शकते. सुरेश रैनावर निवडकर्ते विश्वास दाखवितात काय, हे देखील पाहावे लागेल. तो फिट झाल्यानंतरच संघात राहू शकेल. १० आणि १२ जानेवारीला ब्रेबॉर्न स्टेडियमवर दोन सराव सामन्यांचे आयोजन होत आहे. त्यासंदर्भात भारतीय ‘अ’ संघदेखील निवडला जाईल. बैठकीबाबत अधिकृत माहिती देताना बीसीसीआय सीईओ राहुल जोहरी म्हणाले. ‘सचिवाचे स्थान रिक्त असल्याने मी स्वत: शिर्के यांचे स्थान घेऊ शकतो.’ इंग्लंड संघाचे रविवारी भारतात आगमन होत आहे. ख्रिसमसनिमित्त हा संघ मायदेशी परत गेला होता. धोनीची जागा घेण्यास कोहली निर्णय सज्जनवी दिल्ली : कर्णधारपदावरून पायउतार होण्याचा महेंद्रसिंग धोनीने घेतलेला निर्णय कर्णधारपदाचा राजीनामा योग्य वेळी दिला. कारण कर्णधार म्हणून विराट कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे, असे वक्तव्य राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी केले. विशेष म्हणजे हे वक्तव्य करतानाच त्यांनी संघाचे नेतृत्व विराट कोहलीकडे सोपविण्यात येणार असल्याचेही संकेत दिले. धोनीच्या कर्णधारपदाच्या राजीनाम्याबद्दल प्रसाद म्हणाले की, ‘जर धोनीने एक वर्ष किंवा सहा महिने आधी निर्णय घेतला असता तर मी चिंतेत पडलो असतो; पण त्याने योग्य वेळी हा निर्णय घेतला आहे. त्याला जाणीव आहे की, कोहलीने स्वत:ला सिद्ध केले आहे आणि कर्णधार म्हणून तो चांगली कामगिरी करीत आहे.’