कुस्तीपटू विनेश फोगाटनं मागितली माफी, तरीही मिळणार नाही जागितक स्पर्धेत खेळण्याची संधी!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 10:26 PM2021-08-14T22:26:47+5:302021-08-14T22:27:15+5:30

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाकडून ( WFI) निलंबित करण्यात आलेल्या विनेश फोगाटनं शनिवारी माफी मागितली.

Vinesh Phogat sends apology to WFI, may still not be allowed to compete at Worlds | कुस्तीपटू विनेश फोगाटनं मागितली माफी, तरीही मिळणार नाही जागितक स्पर्धेत खेळण्याची संधी!

कुस्तीपटू विनेश फोगाटनं मागितली माफी, तरीही मिळणार नाही जागितक स्पर्धेत खेळण्याची संधी!

Next

टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत गैरवर्तन केल्याप्रकरणी भारतीय कुस्ती महासंघाकडून ( WFI) निलंबित करण्यात आलेल्या विनेश फोगाटनं शनिवारी माफी मागितली. पण, तरीही WFI तिला आगामी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची संधी देण्याची शक्यता कमीच आहे. टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत विनेशनं भारतीय खेळाडूंसोबत सराव करण्यास नकार दिला होता, शिवाय तिनं भारतीय खेळाडूंशेजारील रुममध्ये राहण्यासही नकार दिला होता. प्रत्यक्ष लढतीतही तिनं भारतीय संघाच्या प्रायोजकांचा नव्हे तर वैयक्तिक प्रायोजकाचा लोगो जर्सीवर लावला होता.  

WFIनं निलंबित केल्यानंतर विनेशनं मौन सोडताना टोकियोतील मानसिक व शारीरिक तंदुरुस्तीशी झगडत असल्याचे सांगितले. शिवाय तिला वैयक्तिक फिजिओला नेण्यास नकार दिल्याचाही खुलासा तिनं केला. शनिवारी २६ वर्षीय विनेश फोगाटनं माफी मागितली. ''WFIच्या निलंबनाच्या कारवाईला विनेश फोगाटनं उत्तर दिले आहे आणि तिनं माफी मागितली आहे. पण, तिच्या माफिनाम्यनंतरही तिला जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत खेळण्याची शक्यता मिळणार नाही,''असे सूत्रांनी PTIला सांगितले. ' 
  

Web Title: Vinesh Phogat sends apology to WFI, may still not be allowed to compete at Worlds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.