शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
4
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
5
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
6
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
7
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
8
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
9
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
10
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
11
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
12
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
13
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
14
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
15
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
16
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
17
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
18
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
19
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
20
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

विजेंदरसह पाच बॉक्सर्सची पदके निश्चित

By admin | Updated: August 1, 2014 01:16 IST

आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग याच्यासह पाच भारतीय बॉक्सर्सनी २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी आज, गुरुवारी उपांत्य फेरीत धडक देत पदके निश्चित केली

ग्लास्गो : आॅलिम्पिक आणि विश्व चॅम्पियनशिपचा कांस्यपदक विजेता विजेंदरसिंग याच्यासह पाच भारतीय बॉक्सर्सनी २० व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आठव्या दिवशी आज, गुरुवारी उपांत्य फेरीत धडक देत पदके निश्चित केली. त्यात दोन महिलांचादेखील समावेश आहे.विजेंदर ७५ किलो, मनदीप जांगडा ६९, एल. देवेंद्रोसिंग ४० किलो यांनी पुरुष गटात दमदार कामगिरी बजावल्यानंतर महिलांमध्ये अनुभवी लैशराम सरितादेवी हिने ६० किलो आणि युवा खेळाडू पिंकी जांगडा हिने ५१ किलो वजनगटात उपांत्य फेरी गाठली. विजेंदरने त्रिनिदाद अ‍ॅण्ड टोबेगोचा अ‍ॅरोन प्रिन्स याला गुणांच्या आधारे ३-० ने नमविले. विश्व क्रमवारीत तिसऱ्या स्थानावर असलेला एल. देवेंद्रोसिंग याने स्कॉटलंडचा अकिल अहमद याचे आव्हान मोडित काढले. मनदीप मात्र रिंगणात येण्याआधीच उपांत्य फेरीत दाखल झाला. आॅस्ट्रेलियाचा डॅनिअल लुईस याला अनफिट झाल्याचा लाभ जांगडाला झाला. ३२ वर्षांची सरितादेवी हिने वेल्सची चार्लेन जोन्सचा हिचा प्रतिकार ३-१ ने मोडित काढला. विजयानंतर सरिता म्हणाली, ‘मी देशासाठी आणि मुलासाठी पदक जिंकू इच्छिते. मी गेल्या पाच महिन्यांपासून भारतीय संघासोबत सराव करीत असल्याने त्याला पाहिलेले नाही. त्याची फार आठवण येते. मी गर्भवती असताना ८५ किलो वजन झाले होते. नंतर पतीची पूर्ण साथ लाभल्याने रिंगणात परतू शकले. मी पदक भारतीयांना समर्पित करू इच्छिते.’ राष्ट्रीय निवड चाचणीत मेरी कोमला नमवून संघात स्थान पटकविणारी युवा पिंकी जांगडा हिने पापुआ न्यू गिनीची जॅक्लिन वांगी हिच्यावर ३-० ने सहज विजय साजरा केला. भारताने स्पर्धेत दहा सुवर्ण, १९ रौप्य आणि १२ कांस्यपदकांसह एकूण ४१ पदके जिंकली आहेत. (वृत्तसंस्था)