शहरं
Join us  
Trending Stories
1
आता उद्धव ठाकरेंनी सांगितले, मविआ राज्यात किती जागा जिंकणार; दोन आकड्यांतून संकेत...
2
हे बळी नव्हे तर खून...! घाटकोपर दुर्घटनेवरून देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात
3
आज बरसणार शब्दबाण! महायुती दाखवेल शिवाजी पार्कवर दम; बीकेसीत ‘इंडिया’ करणार शक्तिप्रदर्शन
4
Diabetes पासून हार्ट डिजीज पर्यंतचे उपचार करणं होणार स्वस्त; सरकारनं ४१ औषधांच्या किंमती केल्या कमी
5
आजचे राशीभविष्य १७ मे २०२४; आजचा दिवस अनुकूल, आनंदाचे वातावरण राहिल
6
अखेर भावेश भिंडे जेरबंद, उदयपूरच्या रिसॉर्टमधून घेतले ताब्यात; ६० तासांनंतर बचावकार्य थांबले
7
"बच्चन घराण्याचे संस्कार", हात फ्रॅक्चर असलेल्या आईला सांभाळताना दिसली आराध्या, ऐश्वर्याच्या लेकीचं होतंय कौतुक
8
भावेश भिंडेची १०० कोटींची कमाई? निविदा १० वर्षांसाठी मंजूर, पण दिली ३० वर्षांची परवानगी
9
रेल्वेने मुंबई महापालिकेचे थकविले ५७२ कोटी; २२ वर्षे पाणीपट्टी, मालमत्ता कर भरलाच नाही
10
काँग्रेस आणि आपमध्ये दुरावा वाढला? राहुल गांधीच्या सभेचे केजरीवालांना निमंत्रण नाही
11
ज्यांना ‘नकली भाजप’ मान्य नाही त्यांनी आम्हाला मत द्यावे, हिंमत असेल तर...: उद्धव ठाकरे
12
बजेट धर्मावर आधारित कधीच नसते, जातींचा विचार करुन देश चालत नाही: शरद पवार
13
शरद पवार गटाच्या नेत्यांना जमावबंदीच्या नोटिसा; १५ ते १९ मे कुठेही फिरु नका, पोलिसांचा आदेश
14
...तर ईडी आरोपीला अटक करू शकत नाही; सुप्रीम कोर्टाचा निकाल, जामिनासाठी अर्ज अनावश्यक 
15
आज पंतप्रधान मोदींची शिवाजी पार्कवर सभा; वाहतूक वळविली, पाहा, महत्त्वाचे बदल
16
कोकण रेल्वेच्या मार्गातील अडथळे होणार दूर, तिन्ही मागण्या पूर्ण करु: रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव
17
काँग्रेसच्या धोरणांनी गरिबी वाढली; नितीन गडकरी यांची टीका
18
शक्तिप्रदर्शनाला महिला बचतगट लाभार्थींची ताकद; खासदारांबरोबरच आमदारांचीही कसोटी
19
निवडून आल्यावर काय करणार? नागरी प्रश्नांना वर्षा गायकवाड यांच्या ‘न्यायपत्रा’ने हमी
20
ढिगाऱ्याखाली कोणी उरले नाही, काम थांबले; महापालिका आयुक्तांची माहिती

Video : 'तू ने मारी एन्ट्री, और...'; बॉलिवूड गाण्यावर पी व्ही सिंधूनं धरला ठेका अन् चुकला अनेकांच्या काळजाचा ठोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2021 12:43 PM

भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला

भारताची बॅडमिंटन स्टार पी व्ही सिंधू यानं टोक्यो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकून इतिहास घडवला. सलग दोन ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी ती भारताची पहिलीच महिला खेळाडू ठरली. रिओ ऑलिम्पिकमध्ये तिनं रौप्यपदक जिंकले होते. मायदेशात परतल्यानंतर पी व्ही सिंधूचे जंगी स्वागत झाले. कोट्यवधींच्या बक्षीसांचा वर्षाव झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत Ice Cream खाण्याचं तिचं स्वप्नही पूर्ण केलं. या सर्वानंतर सिंधूनं तिच्या सहकाऱ्यांसोबत विजयाचा जल्लोष साजरा केला. सोशल मीडियावर तिचा एक व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे आणि त्यात बॉलिवूडच्या गाण्यावर थिरकलेल्या सिंधूला पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. ( PV Sindhu dances to Bollywood music a video has gone viral) 

पदार्पणात हॅटट्रिक घेऊन वर्ल्ड रिकॉर्ड करणाऱ्या ऑसी गोलंदाजाला मिळालं आयपीएलचं तिकीट!

सिंधूनं बॉलिवूडच्या अनेक गाण्यांवर धरलेला ठेका पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.  सुचित्रा बॅडमिंटन अकादमीत तिच्यासाठी खास पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सिंधू यशामागे या व्हिडीओत दिसणाऱ्या प्रत्येकाचा मोलाचा वाटा आहे.  

पुढचे लक्ष्य जागतिक अजिंक्यपद - सिंधूपी.व्ही. सिंधू हिने आपले पुढचे लक्ष्य निश्चित केले आहे. तिला यावर्षी होणाऱ्या विश्व चॅम्पियनशिपमध्ये आपले विजेतेपद कायम राखायचे आहे. तिने सांगितले की, ''स्पेनमध्ये विश्व चॅम्पियनशिप होणार आहे. त्यात चांगला खेळ करण्याची अपेक्षा आहे. मी अजून कांस्य पदकानंतरच्या भावनांमधून बाहेर येऊ शकलेली नाही. मी त्याचा आनंद घेत आहे. सलग दोन ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणे हे नक्कीच इतरांना प्रेरित करेल. लवकरच आंतरराष्ट्रीय स्पर्धा सुरू होतील. तसेच स्पेनमध्ये विश्वचॅम्पियनशिपदेखील होणार आहे. त्यात चांगला खेळ करेल, अशी अपेक्षा आहे. मी निश्चितपणे २०२४ ऑलिम्पिक खेळेल. मात्र त्याला वेळ आहे.''

टॅग्स :PV Sindhuपी. व्ही. सिंधूOlympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021