Vasai-Virar Mayor Marathon; Mohit Rathore, Kiran Sahadev beat | वसई-विरार महापौर मॅरेथॉन; मोहित राठोड, किरण सहदेव यांनी मारली बाजी
वसई-विरार महापौर मॅरेथॉन; मोहित राठोड, किरण सहदेव यांनी मारली बाजी

विरार : स्त्री भ्रूण हत्या टाळा, निसर्ग समतोल पाळा, स्वच्छ वसई, हरित वसई, एक्सपिरियनस द रन अशा आशयाचे संदेश देत मोठ्या उत्साहात वसई-विरार ९ वी महापौर मॅरेथॉन संपन्न झाली. पूर्ण मॅरेथॉनमध्ये पुरुषांमधून भारतीय सेनादलाच्या मोहित राठोड याने सुवर्ण पदकावर आपले नाव कोरले. त्याने २ तास २४ मिनिटे २२ सेकंदांत शर्यत पूर्ण केली. महिलांमध्ये पश्चिम रेल्वेची किरण सहदेवने १ तास १७ मिनिटे १५ सेकंद अशी विजयी वेळ नोंदवली. अर्धमॅरेथॉनमध्ये अनिश थापा व किरण सहदेव यांनी बाजी मारली.

पूर्ण मॅरेथॉनला सकाळी ६ वाजता सुरु झाल्यानंतर मोहितने दोन-तृतीयांश अंतर पार केल्यानंतर अव्वल स्थानी मुसंडी मारली. अखेरपर्यंत त्याने आघाडी कायम राखत २ तास २४ मिनिटे २२ सेकंदात सुवर्ण पटकावले. सुखदेव सिंगने २ तास ३१ मिनिटे ४२ सेकंदात दुसरा क्रमांक पटकावला, तर धर्मेंदर सिंगने तिसरे स्थान मिळवले.

महिलांमध्ये पश्चिम रेल्वेच्या किरण सहदेवने १ तास १७ मिनिटात १५ सेकंदात शर्यत पूर्ण केली. कोमल जगदाळेने १ तास १८ मिनिट २४ सेकंद अशी वेळ देत दुसरा क्रमांक मिळवला. नलिनी गुप्ता हिला तिसऱ्या क्रमांकावर समाधान मानावे लागले.

अर्धमॅरेथॉनमध्ये अनिश थापा याने १ तास ४ मिनीटे ३७ सेकंदाची वेळ देत वर्चस्व राखले. त्याला गाठण्यात थोडक्यात अपयशी ठरलेल्या तिर्था पुन याला १ तास ४ मिनिटे ४२ सेकंदासह रौप्य पदकावर समाधान मानावे लागले. दिनेश कुमारने १ तास ४ मिनिटे ४६ सेकंदासह कांस्य पटकावले. विशेष म्हणजे अर्धमॅरेथॉनमध्ये अव्वल आलेल्या तिन्ही धावपटूंनी जी. लक्ष्मण याचा (१:०४.५६) स्पर्धा विक्रम मोडला.

Web Title: Vasai-Virar Mayor Marathon; Mohit Rathore, Kiran Sahadev beat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.