शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
2
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
3
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
4
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
5
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
6
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
7
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
8
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
9
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
10
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
11
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
12
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
13
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
14
बाबांना चिअर करण्यासाठी वानखेडेवर आला अंगद! जसप्रीत बुमराहच्या लेकाची झलक  
15
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
16
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
17
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
18
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
19
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
20
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप

'मुंबई श्री'च्या अप्रतिम चषकाचे अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 7:39 PM

दीड महिन्यात साकारला फिरता चषक

मुंबई : मला फार चीड येतेय, मी आता का खेळत नाहीय... असं वाटतंय या ट्रॉफीसाठी का होईना, पुन्हा एकदा मुंबई श्रीच्या मंचावर उतरावं... ही ट्रॉफी जिल्हा अजिंक्यपदाची नव्हे तर जगज्जेतेपदाची वाटतेय... अन् ती पाहताच ट्रॉफी, कलेजा खलास झाला...शरीरसौष्ठव क्षेत्रातील दिग्गजांच्या एकापेक्षा एक अशा भावनांनी स्पार्टन मुंबई श्रीच्या किताब विजेत्या चषकाचं मोठ्या धुमधडाक्यात अनावरण करण्यात आलं. अद्वितीय... अप्रतिम... जबरदस्त... अशी विशेषणंही कमी वाटावीत इतक्या सुंदर चषकाची पहिली झलक पाहिल्dयानंतर हा चषक आपल्dयाकडेच आला पाहिजे, यासाठी मुंबईच्या पीळदार शरीरसौष्ठवपटूंनी आपल्या वर्पआऊटला आणखी जोर लावल्याचे चित्र दिसत आहे.

मुंबई शरीरसौष्ठवाची प्रतिष्ठा असलेली स्पार्टन मुंबई श्री यंदा इतिहास घडवणार, याची पहिली झलक चषक अनावरण सोहळ्याच दिसली. मुंबईच्या शरीरसौष्ठवाला खऱया अर्थाने श्रीमंत करण्याचे स्वप्न उराशी बाळगून मुंबई श्रीच्या आयोजनाचे शिवधनुष्य उचलणाऱया आरोग्य प्रतिष्ठानने चषक अनावरण सोहळ्यालाच उपस्थित शरीरसौष्ठव संघटक आणि शरीरसौष्ठवपटूंची मनं जिंकली. भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सर्वेसर्वा चेतन पाठारे आणि मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे अमोल किर्तीकर, अजय खानविलकर, राजेश सावंत, सुनिल शेगडे,  विक्रम रोठे आणि स्पार्टन न्यूट्रिशियनचे वृषभ चोकसी या शक्तीशाली संघटकांच्या उपस्थितीत चषकाचे अनावरण करण्यात आले. चषकाची पहिली झलक पाहताच उपस्थितांनी अद्वितीय अशी दाद दिली. चषकाचं रूप पाहून सारेच आश्चर्यचकित झाले. इतकी कल्पक, भव्यदिव्य ट्रॉफी आजवर कोणत्याही स्पर्धेला देण्यात आली नसावी. ती ट्रॉफी पाहून सारेच तिच्या प्रेमात पडले. त्यामुळे तिला जिंकण्यासाठी पुन्हा एकदा दोनशेपेक्षा अधिक शरीरसौष्ठवपटूंमध्ये जोरदार द्वंद्व रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

 

 

मी आता का खेळत नाहीय... श्याम रहाटे

दोनवेळा मुंबई श्रीचा बहुमान पटकावणारा श्याम रहाटेसुद्धा मुंबई श्रीच्या प्रेमात पडला. चषकाचं भव्यदिव्य रूप पाहून तो म्हणाला, मला चीड येतेय, मी आता का खेळत नाहीय? या चषकासाठी पुन्हा एकदा मुंबई श्रीच्या मंचावर उतरण्याची माझी इच्छा झालीय. ही ट्रॉफी मुंबई श्रीच्या भव्यतेची साक्ष देतेय.

मुंबई श्रीच्या ट्रॉफीला तोड नाही - मनीष आडविलकर

मी अनेकवेळा मुंबई श्रीसाठी माझी सर्वोत्तम कामगिरी दिली. मी ती कधीच जिंकू शकलो नाही. पण आज पुन्हा वाटलं की या ट्रॉफीसाठी का होईना पुन्हा एकदा पोझ मारूया. मुंबईकरांसाठी मुंबई श्रीचं महत्त्व फार वेगळं आहे आणि यंदाच्या ट्रॉफीला तर तोडच नाही. ही ट्रॉफी जिंकणारा मुंबई श्री खरोखरच भाग्यवान असेल.

मुंबई श्रीला आंतरराष्ट्रीय दर्जा - खानविलकर

आरोग्य प्रतिष्ठानच्या किरण कुडाळकर, प्रभाकर कदम, गजानन टक्के, राजेश निकम, विशाल परब, जयदीप पवार या संघटकांनी केलेल्dया किमयेमुळे मुंबई श्रीला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेऊन ठेवलेय. मुंबई श्रीच्या जबरदस्त चषकामुळे आता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांच्या आयोजनात पुढाकार घेणाऱया चेतन पाठारेंवर आणखी दबाव वाढला आहे. आता त्यांना मुंबई श्रीपेक्षा चांगली ट्रॉफी बनवावी लागेल. हेसुद्धा एक आव्हान असेल.

दीड महिन्यात साकारला फिरता चषक

यंदा मुंबई श्री किताब विजेत्या काही आगळंवेगळं द्यायचं, हे आमच्या मनात असल्dयाची भावना आयोजक प्रभाकर कदम यांनी मांडली. चषकात शरीरसौष्ठवाचं सारंकाही असलेल्dया सात पोझेस दिसल्dया पाहिजेत, ही आमची भावना होती. आमच्या कल्पनेपेक्षा भव्य आणि दिव्य ट्रॉफी मंगेश सुतार यांनी साकारलीय. सुतार यांनी दीड महिन्यात मूर्तीकार गणेश हासमकर यांच्या मदतीने सात खेळाडूंच्या सात पोझेसच्या मूर्त्या बनवल्dया. हेच काम सर्वाधिक वेळखाऊ होतं. त्यावर मग सहा हातात सामावलेली पृथ्वी दाखवण्यात आली. 19 किलो वजनाच्या या चषकाचं वैशिष्ट्य म्हणजे सात पोझेस मारणारे खेळाडू मोटरच्या साहाय्याने फिरतात ते. हा फिरता चषकच यंदाच्या स्पर्धेचं विशेष आकर्षण आहे.

टॅग्स :bodybuildingशरीरसौष्ठवMumbaiमुंबई