UFC star Paige VanZant trains NAKED with coronavirus lockdown workout svg | जगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय? 'Nude' होत करतेय जिम!

जगात चाललंय काय अन् ही महिला खेळाडू करतेय काय? 'Nude' होत करतेय जिम!

कोरोना व्हायरसनं जगाला वेठीस धरले आहे. जगभरात आतापर्यंत 8 लाख 59, 947 कोरोना रुग्ण आढळले असून मृतांची संख्या 42, 344 च्या घरात गेली आहे. या व्हायरसपासून बऱ्या होणाऱ्या रुग्णांचा आकडा हा 1 लाख 78,364 इतका आहे. या व्हायरसमुळे जगभरात अनेक देशांनी लॉकडाऊन केलं आहे. जगभरातील जवळपास सर्व क्रीडा स्पर्धा रद्द किंवा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्व खेळाडूंना घरीच रहावे लागत आहेत. क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या असल्या तरी खेळाडू आपल्या फिटनेसकडे दुर्लक्ष करत नाही. प्रत्येक खेळाडू घरच्या घरी किंवा स्वतःच्या पर्सनल जिममध्ये व्यायाम करून स्वतःला तंदुरुस्त ठेवत आहेत. 

एक महिला खेळाडूनं व्यायाम करताना हद्द केली. जगात भीतीचं वातावरण असतान ही महिला खेळाडू चक्क Nude होऊन व्यायाम करत आहे. तसे फोटो तिनं सोशल मीडियावर अपलोडही केले आणि नेटिझन्स त्यावर तुटूनही पडले. अमरिकेत सध्या कोरोनाचा सर्वाधिक कहर होताना दिसत आहे. आतापर्यंत येथे 1 लाख 88,592 रुग्ण आढळले आहेत आणि त्यापैकी 4056 लोकांना प्राण गमवावे लागले आहेत. अशा परिस्थितीत अमेरिकेचीच महिला खेळाडूचा प्रताप पाहायला मिळत आहे.

मिक्स मार्शल आर्ट्सची स्टार खेळाडू पैगे व्हॅनझँटनं सोशल मीडियावर एक फोटो पोस्ट केला आहे. अल्टीमेट फायटिंग चॅम्पियनशीप ( UFC ) मधील स्टारनं शेअर केलेल्या फोटोत ती आणि तिचा पती न्युड ( नग्नावस्थेत) व्यायाम करताना दिसत आहेत. तिच्या या फोटोला अवघ्या काही तासांत 1 लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. अमेरिकेची 26 वर्षीय स्टार खेळाडू फिटनेसच्या बाबतीत काटेकोर आहे. तिचा पती ऑस्टीन वँडरफोर्ड हाही मिक्स मार्शल आर्ट्सचा फायटर आहे आणि हे दोघेही घरातील जिममध्ये व्यायाम करताना दिसत आहेत.


याच महिला खेळाडूनं एका इंस्टाग्रामवर लाईव्ह चाहत्यांशी संवाद साधला होता आणि तो सुरू असताना चक्क ती पतीसोबत बाथरूममध्ये आंघोळ करण्यासाठी गेली होती. ( UFC महिला चॅम्पियनचा प्रताप; अंघोळ करत चाहत्यांच्या प्रश्नांना दिली LIVE उत्तरं!)

अऩ्य महत्त्वाच्या बातम्या

Corona Virus ने कटुता मिटवली; दिलदार भज्जी अन् युवी धावले आफ्रिदीच्या मदतीला

इंग्लंड क्रिकेट बोर्डानं उघडला खजिना; केली 570 कोटींची मदत

 तुमची लाज वाटते... युवराज सिंग अन् भज्जीवर भडकले नेटीझन्स 

मजहब नहीं सिखाता बैर करना... शाहिद आफ्रिदीची पाकिस्तानातील हिंदू, ख्रिश्चन समाजाला मदत

 सुरेश रैनाच्या मदतीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं 'Brilliant' रिप्लाय... 

रस्त्यावर उतरून गरिबांना मदत करतोय क्रिकेटपटू; घेतली 200 कुटुंबांची जबाबदारी

भारताचा यष्टिरक्षक-फलंदाज गरजूंना मदत करण्यासाठी उतरला रस्त्यावर

Web Title: UFC star Paige VanZant trains NAKED with coronavirus lockdown workout svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.