शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

'सुशीलसाठी चाचणी पुढे नेणार नाही'

By ऑनलाइन लोकमत | Published: January 03, 2020 1:56 AM

भारतीय कुस्ती महासंघाने केले स्पष्ट; ऑलिम्पिकसाठी मिळू शकते संधी

नवी दिल्ली : दुखापतग्रस्त सुशील कुमार याने ७४ किलो फ्रीस्टाईल वजनगटासाठी शुक्रवारी होणारी चाचणी पुढे ढकलण्याची विनंती केली असली, तरी चाचणी पुढे ढकलणार नसल्याचा निर्णय भारतीय कुस्ती महासंघाने घेतला आहे. या गटाची चाचणी पूर्वनिर्धारित वेळापत्रकानुसारच होईल. दोनदा आॅलिम्पिकचे वैयक्तिक पदक जिंकणाऱ्या सुशीलने हाताला दुखापत झाल्यामुळे चाचणीतून माघार घेतली. ७४ किलोची चाचणी पुुढे ढकलण्याची त्याने महासंघाला विनंती केली होती.त्याला मात्र मार्चमध्ये टोकियो आॅलिम्पिकची पात्रता गाठण्याची संधी मिळू शकते. चाचणीतील विजेता मल्ल रोम येथे १५ ते १८ जानेवारीदरम्यान रँकिंग सिरीजमध्ये, नवी दिल्लीत १८ ते २३ फेब्रुवारीदरम्यान आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत व चीनमध्ये २७ ते २९ मार्च या कालावधीत होणाºया आशियाई आॅलिम्पिक पात्रता फेरीत भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे.कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषणसिंग यांच्यानुसार सर्व गटाची चाचणी शुक्रवारीच होईल. ते पुढे म्हणाले, ‘चाचणीचे आयोजन टाळता येणार नाही. आमच्याकडे ७४ किलो गटात लढणारे मल्ल आहेत. सुशील दुखापतग्रस्त झाला असेल, तर आम्हाला पुढचा मार्ग शोधावाचलागेल.’पुरुष फ्री स्टाईलमध्ये रवी दहिया(५७ किलो), बजरंग (६५) व दीपक पुनिया (८६) तसेच महिलांमध्ये विनेश फोगाट (५३) यांनी नूर सुल्तानमध्ये विश्व अजिंक्यपदमध्ये टोकियो आॅलिम्पिकसाठी कोटा मिळविला. रवी, दीपक व विनेश यांना चाचणीत सहभागी होण्यास सांगण्यात आले आहे. या गटातील लढती केवळ रोम व नवी दिल्ली येथील स्पर्धांसाठी होतील. कुस्ती महासंघाचे सहाय्यक सचिव विनोद तोमर म्हणाले, ‘मार्चमध्ये होणाºया आशियाई पात्रता फेरीसाठी दमदार मल्ल नसल्याचे महासंघाला वाटले तरच सुशीलला चाचणीची संधी मिळेल.’ सुशील पुनरागमनासाठी संघर्ष करीत असून रशियाचे प्रशिक्षक कमाल मालिकोव्ह यांच्या मार्गदर्शनात सराव करतोय.

टॅग्स :Sushil Kumarसुशील कुमार