टीम इंडियामुळे पर्यटन उद्योगाला ‘अच्छे दिन’
By Admin | Updated: February 26, 2015 00:53 IST2015-02-26T00:53:15+5:302015-02-26T00:53:15+5:30
टीम इडियाच्या देखण्या कामगिरीमुळे आॅस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये पर्यटन उद्योगाला अधिक लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली

टीम इंडियामुळे पर्यटन उद्योगाला ‘अच्छे दिन’
टीम इडियाच्या देखण्या कामगिरीमुळे आॅस्ट्रेलिया- न्यूझीलंडमध्ये पर्यटन उद्योगाला अधिक लाभ होण्याची शक्यता निर्माण झाली. पाक आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळविल्यानंतर विश्वचषकातील भारताच्या लढतींसाठी येथे येणाऱ्या भारतीय पर्यटकांची संख्या वाढली. यापेक्षा अधिक लोक येतील, असे मानले जात आहे.
गेल्या रविवारी मेलबोर्न येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताने
सामना खेळला, त्या वेळी
एमसीजीवर ८७ हजार प्रेक्षक होते. त्यात भारतीयांची संख्या ७५ हजार होती.
भारतीयांचा हा उत्साह दोन्ही यजमान राष्ट्रांमधील पर्यटन उद्योगाची भरभराट करणारा ठरला. तसेही विश्वचषकामुळे आॅस्ट्रेलिया
आणि न्यूझीलंडमधील पर्यटन
उद्योग तेजीत आहे. टॅक्सीचालक, रेस्टॉरंट मालक, टूर गाईड यांचे ‘अच्छे दिन’ सुरू झाले. त्यांच्याशी चर्चेदरम्यान या गोष्टींची खात्रीदेखील पटते.
भारतीय प्रेक्षकांची आणखी संख्या वाढेल, या आशेपोटी सर्व लोक उत्साही आहेत. येथे चीनचे काही पर्यटक दृष्टीस पडतात; पण ते क्रिकेटचा आनंद लुटण्यासाठी नव्हे, तर नववर्षाचा आनंद साजरा करण्यासाठी येथे आले आहेत.