Paralympics 2020 : अभिमानास्पद! भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्ण पदकापासून फक्त एक पाऊल दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 08:34 IST2021-08-28T07:58:02+5:302021-08-28T08:34:33+5:30

Tokyo Paralympics Live Updates: Paddler Bhavina Patel wins to enter gold-medal match : भारताचं पहिलं पदक निश्चित झालं असून पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देण्यापासून अवघं एक पाऊल दूर आहे.

Tokyo Paralympics Live Updates: Paddler Bhavina Patel wins to enter gold-medal match | Paralympics 2020 : अभिमानास्पद! भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्ण पदकापासून फक्त एक पाऊल दूर

Paralympics 2020 : अभिमानास्पद! भाविना पटेलची ऐतिहासिक कामगिरी, सुवर्ण पदकापासून फक्त एक पाऊल दूर

टोकियो पॅरालिम्पिकमधील टेबल टेनिस स्पर्धेत (Tokyo Paralympics, Table Tennis) भारताच्या भाविना पटेल (Bhavinaben Patel) हिने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारताचं पहिलं पदक निश्चित झालं असून पॅरालिम्पिकमध्ये भारताला पहिलं सुवर्णपदक (Gold Medal) मिळवून देण्यापासून अवघं एक पाऊल दूर आहे. भाविना पटेलने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या स्थानी असलेल्या चीनच्या मियाओ झांगचा (Miao Zhang) पराभव केला आहे. अत्यंत चुरशीच्या सामन्यात भाविनाने मियाओचा 3-2 (11-7, 7-11, 4-11, 11-9, 8-11) असा पराभव केला आहे.

भाविनाने या विजयासह अंतिम फेरी गाठली असून टोकियो पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतासाठी पहिलं पदक निश्चित केलं आहे. "मी फक्त माझं 100 टक्के दिलं आहे. अंतिम फेरीसाठी मी मानसिकदृष्ट्या तयार आहे. काहीही अशक्य नाही हे मी सिद्ध केलं आहे" असं भाविना पटेलने म्हटलं आहे. तसेच "आज मी खूप आनंदी आहे. भाविना पटेल नक्कीच सुवर्णपदक जिंकणार आहे. गेली 20 वर्षे ती टेबल टेनिस खेळत आहे" असं भाविनाचे वडील हसमुखभाई पटेल यांनी म्हटलं आहे. 


 

Web Title: Tokyo Paralympics Live Updates: Paddler Bhavina Patel wins to enter gold-medal match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.