शहरं
Join us  
Trending Stories
1
एक दिवस फॅन्स अन् क्रिकेटपटू यांच्यातल्या विश्वासाला तडा जाईल, Rohit Sharma चं विधान
2
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
3
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
4
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
5
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
6
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
7
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
8
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
9
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
10
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
11
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल
12
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
13
श्रेयस अय्यर, इशान किशन यांना BCCI कडून सेकंड चान्स; घेतला गेला मोठा निर्णय 
14
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
15
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
16
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
17
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
18
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
19
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
20
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत

Tokyo Paralympics: हरविंदर सिंगनं तिरंदाजीत पदक जिंकून रचला इतिहास, भारताचे आजच्या दिवसातील तिसरे पदक 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2021 6:04 PM

Tokyo Paralympics: भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग यानं शुक्रवारी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली.

Tokyo Paralympics: भारताचा तिरंदाज हरविंदर सिंग यानं शुक्रवारी टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी केली. त्यानं पुरुष वैयक्तिक रिकर्व्ह गटात कांस्यपदकासाठीच्या सामन्यात दक्षिण कोरियाच्या किम मिन सू याच्यावर ६-५ असा विजय मिळवला. पॅरालिम्पिक स्पर्धेत तिरंदाजीतील हे भारताचे पहिलेच पदक ठरले. या पदकामुळे भारताच्या खात्यातील पदकसंख्या १३ अशी झाली आहे. ( Harvinder Singh wins bronze in the men's individual recurve event)  आजच्या दिवसातील भारताचे हे तिसरे पदक ठरले. याआधी  प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक आणि  नेमबाज अवनी लेखर हिनं कांस्यपदक जिंकले.

  अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) उंच उडीत रौप्य पदक जिंकल्यानंतर भारताच्या खात्यात आणखी एका पदकाची भर पडली आहे. टोकियो पॅरालिम्पिकमधील 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने कांस्यपदक पटकावले आहे. याआधी अवनी लेखरा हिची टोकियो पॅरालिम्पिकमध्ये सुवर्ण कामगिरी पाहायला मिळाली होती.  10 मीटर एअर रायफल स्पर्धेत अवनी लेखराला सुवर्ण पदक मिळाले  होते. 

भारताचा अॅथलिट प्रवीण कुमारने (Praveen Kumar) देशासाठी आणखी एक रौप्य पदक जिंकले आहे. प्रवीण कुमारने पुरुषांच्या T44 उंच ऊडी स्पर्धेत हा पराक्रम केला. उंच उडीत भारताला मिळालेले हे तिसरे पदक आहे. यापूर्वी निषाद कुमार आणि मरियप्पन यांनी भारतासाठी रौप्य पदके जिंकली होती. प्रवीण कुमारने पुरुषांच्या उंच उडी टी 64 स्पर्धेत 2.07 मीटरची नोंद केली. हा आशियाई विक्रम ठरला आहे. ब्रिटनच्या जोनाथन ब्रूम-एडवर्ड्सने 2.10 मीटरसह सुवर्ण, तर पोलंडच्या मॅसिज लेपियाटोने 2.04 मीटरसह कांस्य पदक जिंकले.

टॅग्स :Paralympic Gamesपॅरालिम्पिक स्पर्धाTeam Indiaभारतीय क्रिकेट संघ