शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
3
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
4
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
5
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
6
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
7
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
8
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
9
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
10
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
11
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
12
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
13
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
14
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
15
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
16
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
17
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
18
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
19
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
20
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"

Tokyo olympics: ‘किक बॉक्सर’ ते बाॅक्सर, संयम हे लवलीनाचे वैशिष्ट्य

By ऑनलाइन लोकमत | Published: July 31, 2021 6:14 AM

Tokyo olympics Live Updates: लवलीना टोकियोचे तिकीट मिळविणारी आसामची पहिली खेळाडू होती. मेरोकोम बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना लवलीनाने स्वत:च्या कामगिरीद्वारे आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली.

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी दुसरे पदक निश्चित करणारी बॉक्सर लवलीना बोरगोहेन हिला या खेळाकडे वळविणारे साईचे कोच पदम बोरो यांनी कालच सांगितले होते, ‘की लवलीना सहज जिंकेल, टेेन्शन घेऊ नका’! लवलीना आधी किक बॉक्सर होती. तिला हौशी बॉक्सिंगकडे वळविण्याचे श्रय बोरो यांना जाते. आसामच्या या २३ वर्षाच्या मुलीने गोलाघाटबरो मुखिया गावातून खेळाचा प्रवास सुरू केला. जवळच काझीरंगा राष्ट्रीय अभयारण्य आहे. मोठ्या बहिणी लीचा आणि लीमा या किकबॉक्सर आहेत. मर्यादित साधने असताना आईवडिलांनी तिन्ही मुलींच्या खेळातील आवडीनिवडी जोपासल्या. लवलीनाच्या स्वप्नपूर्तीसाठी आईवडिलांनी मुलीला बोरो यांच्याकडे सोपविले. चेहऱ्यावर हास्य ठेवणारी लवलीना टोकियोचे तिकीट मिळविणारी आसामची पहिली खेळाडू होती. मेरोकोम बाहेर पडल्यानंतर निराश झालेल्या भारतीय चाहत्यांना लवलीनाने स्वत:च्या कामगिरीद्वारे आनंद साजरा करण्याची संधी मिळवून दिली.बोरो म्हणतात, ‘लवलीनाचा शांत स्वभाव हे तिचे वैशिष्ट्य आहे. ती सहजपणे पराभूत होणाऱ्यांपैकी नाही. टेन्शन कधीच घेत नाही शिवाय शिस्तप्रिय आहे. मागच्यावर्षी आईच्या किडनी प्रत्यारोपणासच्यावेळी काही दिवस जवळ होती. नंतर ५२ दिवस युरोपात सरावाला जाण्याआधी लवलीना कोरोनाबाधित झाली. याचा फटका आशियाई स्पर्धेत बसला. पहिल्याच फेरीत ती पराभूत झाली. एकदा एकाग्रता भंग झाल्यामुळे तिने ध्यानसाधना करण्याचा निर्णय घेतला. याच एकाग्रतेच्या बळावर शुक्रवारी लवलीनाने कारकिर्दीत सर्वांत मोठे बक्षीस मिळविले आहे.’ 

टॅग्स :Lovelina Borgohainलव्हलीना बोरगोहाईंindia at olympics 2021भारत ऑलिंपिक 2021