शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
4
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
5
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
6
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
7
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
8
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
9
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
10
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
11
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
12
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
13
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
14
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
15
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
16
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
17
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
18
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
19
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
20
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी

Tokyo Olympic : जेव्हा एकटी, कोपऱ्यात उभी होती टीम इंडिया, तेव्हा गपचूप येऊन पकडला हात; त्यामुळेच आज घडला इतिहास!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2021 3:18 PM

Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले.

Tokyo Olympic 2020 : भारतीय पुरुष हॉकी संघानं गुरुवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १९८०नंतर भारतीय संघानं ऑलिम्पिक स्पर्धेचे पदक जिंकले. भारतानं कांस्यपदकांच्या लढतीत जर्मनीवर ५-४ असा थरारक विजय मिळवून कांस्यपदक जिंकले अन् ४१ वर्षांचा पदकाचा दुष्काळ संपवला. सिमरनजीत सिंगचे दोन गोल अन् रुपिंदरपाल सिंग, हरमनप्रीत सिंग व हार्दिक सिंग यांनी प्रत्येकी एक गोल करून पिछाडीवरून मुसंडी मारली. भारतीय हॉकीचा हा सुवर्णकाळ पुन्हा पाहायला मिळाल्याबद्दल लोकं ओदिशा सरकारचे आभार मानत आहेत. 

ओदिशा सरकारनं २०१८मध्ये हॉकी इंडियासोबत ५ वर्षांचा करार केला आणि ज्युनियर, सीनियर, पुरुष व महिला राष्ट्रीय संघासाठी १५० कोटींचा करार केला. २०२३पर्यंत हा करार आहे आणि याशिवाय ओदिशा सरकार वर्ल्ड क्लास ट्रेनिंग, रिहॅब फॅसिलिटी, प्रॅक्टिस पिचच्या माध्यमातून भारतीय हॉकीला संजिवनी दिली आहे. त्यामुळेच हॉकी इंडियासोबत ओदिशा सरकार व मुख्यमंत्री नवीन पटनायक यांचे आभार मानले जात आहे.  २०१३पासून ओदिशा सरकार हॉकीला प्रमोट करत आहे. २०१३मध्ये हॉकी इंडिया लीग खेळवण्यात आली तेव्हा ओदिशा राज्यातील दोन व्यावसायिकांनी कलिंगा लँसर्स फ्रँचायझी खरेदी केली. २०१४मध्ये ओदिशा सरकारनं चॅम्पियन्स ट्रॉफीचे यजमानपद भूषविले होते. त्यानंतर २०१७ हॉकी वर्ल्ड लीग आणि २०१८ हॉकी वर्ल्ड कप येथे झाला होता. २०२३ चा हॉकी वर्ल्डकपही येथे आयोजित करण्याच्या हालचाली सुरू आहेत. 

ओदिशाचे मुख्यमंज्ञी नवीन पटनायक यांनी भारतीय पुरुष हॉकी संघातील खेळाडूंचे अभिनंदन करण्यासाठी व्हिडीओ कॉल केला. त्यांनी हा व्हिडीओ ट्विटरवर पोस्ट केला.    

सहारा इंडिया परिवारानं केलं हॉकी संघाचे अभिनंदनभारतीय हॉकी संघाला २२ वर्ष प्रायोजकत्व देणाऱ्या सहारा इंडिया परिवारानंही आजच्या यशानंतर खेळाडूंचे अभिनंदन केले.  हा भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. 

टॅग्स :Olympics 2020टोकियो ऑलिम्पिक 2021OdishaओदिशाHockeyहॉकी