आजपासून आॅलिम्पिकचा महाकुंभ!

By Admin | Updated: August 5, 2016 07:13 IST2016-08-05T05:44:47+5:302016-08-05T07:13:54+5:30

आॅलिम्पिकची क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल आणि आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्वप्नस्पर्धेला प्रारंभ होईल

From today, the Mahakumbh of the Olympics! | आजपासून आॅलिम्पिकचा महाकुंभ!

आजपासून आॅलिम्पिकचा महाकुंभ!

रिओ- खेळाचा महाकुंभ असलेल्या आॅलिम्पिकची क्रीडा ज्योत महान फुटबॉलपटू पेले यांच्या हस्ते प्रज्वलित होईल अन् आकाश उजळून सोडणाऱ्या आतशबाजीने खेळाडूंच्या स्वप्नस्पर्धेला प्रारंभ होईल. दक्षिण अमेरिकेत ब्राझिलमध्ये प्रथमच होत असलेल्या आॅलिम्पिक महाकुंभाचा हा उद्घाटनीय सोहळा रिओतील माराकाना स्टेडियममध्ये होणार आहे. हा सोहळा म्हणजे नैसर्गिक सौंदर्यांत १७ दिवस रंगणाऱ्या उत्सवाची शानदार सुरुवात ठरेल. या स्पर्धेसाठी दाखल झालेल्या भारतीय खेळाडूंकडून साऱ्यांनाच अपेक्षा आहेत. 

डोपिंग स्कँडलमुळे उत्साहावर काहीसे विरजण पडले, तरीही शनिवारी पहाटे उद्घाटन सोहळ्याद्वारे सुरू होत असलेल्या ३१व्या आॅलिम्पिक क्रीडा महाकुंभात सर्वांत मोठ्या भारतीय पथकाकडून सर्वोत्कृष्ट कामगिरीसह अधिकाधिक पदकांच्या अपेक्षा सव्वाशे कोटी भारतीय बाळगून आहेत. लंडनच्या सहा पदकांच्या तुलनेत यंदा दुप्पट पदके भारताला मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
 
भारतीय पथकातील ११८ खेळाडू पदकांची संख्या दुप्पट करण्याच्या प्रयत्नात निश्चितच असतील. धावपटू धरमवीर आणि गोळाफेकपटू इंदरजितसिंग हे डोपिंगमध्ये अपयशी ठरल्याने त्यांना भारतातच थांबण्यास सांगण्यात आले आहे. याआधी नरसिंगदेखील डोपिंगमध्ये अपयशी ठरला होता; पण नाडाच्या सुनावणीत तो सहीसलामत बाहेर पडल्यामुळे आणि विश्व कुस्ती महासंघाने परवानगी बहाल केल्याने नरसिंग येथे पोहोचण्याची शक्यता आहे.

Web Title: From today, the Mahakumbh of the Olympics!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.