शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

फेडरर तिसऱ्या फेरीत

By admin | Updated: July 8, 2017 01:21 IST

सात वेळेसचा चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डनच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली

लंडन : सात वेळेसचा चॅम्पियन स्वित्झर्लंडच्या रॉजर फेडरर याने वर्षातील तिसरी ग्रँडस्लॅम स्पर्धा विम्बल्डनच्या पुरुष एकेरीत तिसरी फेरी गाठली. त्याने गुरुवारी रात्री उशिरा झालेल्या दुसऱ्या फेरीच्या लढतीत सर्बियाच्या डुसान लाजोविक याचा पराभव केला.पुढील महिन्यात ३६ वर्षांचा होणाऱ्या फेडररने लाजोविक याचा ७-६ (0), ६-३, ६-३, असा पराभव केला. जागतिक क्रमवारीतील ७९ व्या मानांकित लाजोविक पहिल्या सेटमध्ये फेडररची दोनदा सर्व्हिस भेदताना २-0 अशी आघाडी घेतली होती; परंतु फेडररने लगेच मुसंडी मारली. पहिला सेट जिंकल्यानंतर फेडररने प्रतिस्पर्ध्यावर दबाव कायम ठेवला आणि ३-१ ने आघाडी घेतली. त्यानंतर १८ ग्रँडस्लॅम विजेतेपद आपल्या नावावर करणाऱ्या फेडररने मागे वळून पाहिले नाही आणि सहजपणे तिसऱ्या फेरीत प्रवेश केला.सामन्यानंतर फेडरर म्हणाला, ‘पहिल्या सेटमध्ये मला संघर्ष करावा लागला. मी आपली सर्व्हिस चांगली करू शकलो नव्हतो. त्यानंतर मी चांगली मुसंडी मारली.’ फेडररचा पुढील सामना २७ व्या मानांकित जपानच्या ज्वेरेव्ह याच्याविरुद्ध होणार आहे. (वृत्तसंस्था)