आयपीएलबाबत अनिश्चितता कायम
By Admin | Updated: March 10, 2017 23:44 IST2017-03-10T23:44:04+5:302017-03-10T23:44:04+5:30
भारतीय क्रि केट बोर्डासाठी (बीसीसीआय) सर्वाधिक कमाईचे साधन असलेल्या लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या पर्वावर संकट ओढवले आहे.

आयपीएलबाबत अनिश्चितता कायम
राज्य संघटना अडचणीत : बीसीसीआयला नुकसान होणार
नवी दिल्ली : भारतीय क्रि केट बोर्डासाठी (बीसीसीआय) सर्वाधिक कमाईचे साधन असलेल्या लोकप्रिय इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) दहाव्या पर्वावर संकट ओढवले आहे. सुप्रीम कोर्टाने नियुक्त केलेली प्रशासकीय समिती (सीओए) आणि विविध राज्य क्र ीडा संघटनांमध्ये लोढा समितीच्या शिफारशींचे पालन करण्यावरून वाद सुरू असल्याने आयपीएलच्या यंदाच्या पर्वावर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाल्याचे सूत्रांचे मत आहे.
बीसीसीआय उच्चस्तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयपीएल सामन्यांचे आयोजन करण्यासाठी राज्य क्र ीडा संघटनांना लागणाऱ्या निधीचे वाटप होऊ शकणार नाही. त्यामुळे आयपीएलचे सामने आयोजित करणे कठीण होऊन बसणार आहे. आयपीएल स्पर्धा न झाल्यास बीसीसीआयला याचा सर्वात मोठा फटका बसेल. ‘बीसीसीआय’ला तब्बल अडीच हजार कोटींचे नुकसान होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
आयपीएलच्या प्रत्येक सामन्याच्या आयोजनासाठी राज्य क्र ीडा संघटनांना ६० लाख रु पये दिले जातात. यातील ३० लाख बीसीसीआयकडून तर उर्वरीत ३० लाख इतर प्रायोजकांकडून मिळतात. राज्य क्र ीडा संघटना हा निधी सामना आयोजन, सराव , प्रकाशव्यवस्था, मैदानाची इतर तयारी आणि ग्राऊंड स्टाफवर खर्च करतात. यापूर्वी आयपीएल आयोजनासाठी अॅडव्हान्स रक्कम दिली जायची, पण आता तशी परिस्थिती राहिलेली नाही. लोढा समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी बीसीसीआय व संलग्न राज्य संघटना करीत नाही, तसेच अंमलबजावणींचे तंतोतंत पालन होत असल्याची सीओएला खात्री पटत नाही. तोपर्यंत बीसीसीआयला कोणताही खर्च करता येणार नाही, असा आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. (वृत्तसंस्था)