शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

पाकविरुद्ध भारतावर दबाव असेल : व्यंकटपती राजू

By admin | Updated: February 5, 2015 01:25 IST

१५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.

नवी दिल्ली : विश्वचषकात टीम इंडिया पाककडून कधीही पराभूत झालेला नाही. यंदा मात्र अ‍ॅडिलेड येथे १५ फेब्रुवारी रोजी खेळल्या जाणाऱ्या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघांच्या लढतीत दबाव गत विजेत्या भारतीय संघावर असेल, असे मत माजी फिरकीपटू व्यंकटपती राजू याने व्यक्त केले आहे.आशियाई क्रिकेट परिषदेचे विकास अधिकारी असलेला राजू म्हणाला, की पाकच्या तुलनेत भारताची अलीकडील कामगिरी सरस आहे. पण गत चॅम्पियन या नात्याने आणि पाकविरुद्धचा विजयी रेकॉर्ड कायम ठेवायचा असल्याने जिंकण्यासाठी भारतावर दबाव असेल. पाककडे गमावण्यासारखे काहीही नाही. १९९२ साली आॅस्ट्रेलिया-न्यूझीलंडमध्ये झालेल्या विश्वचषकात राजू भारतीय संघाचा सदस्य होता. तो म्हणाला, की विश्वचषकात भारत- पाक सामना पाहणे हा थरार असतो. आमच्यावरही दबाव येतो. भारताला चॅम्पियन बनायचे झाल्यास पाकला पराभूत करावे लागेल. फिल्डिंगमध्ये आलेल्या मर्यादा आणि पॉवरप्लेबाबतचे नवे नियम यामुळे भारतीय उपखंडातील सेमीफायनल गाठणे कठीण होईल. १९९२ आणि आताची स्थिती वेगळी आहे. त्या वेळी क्षेत्ररक्षणावर मर्यादा नव्हत्या. आता ३० यार्डमध्ये पाच खेळाडू अनिवार्य असतात आणि पॉवरप्लेदेखील असतो. भारताने अंतिम चार संघांत स्थान मिळवावे, अशी इच्छा व्यक्त करीत चारमध्ये भारत येईलच, याचा अंदाज बांधणे कठीण असल्याचे राजूचे मत आहे. आॅस्ट्रेलिया आणि द. आफ्रिका हे दोन बलाढ्य संघ असल्याचे तो म्हणाला. न्यूझीलंड, भारत आणि लंका हे अखेरच्या सहा संघांत स्थान मिळवू शकतात, पण भारतीय उपखंडात मेहनत घ्यावी लागेल. भारतीय गोलंदाज आॅस्ट्रेलियात निष्प्रभावी ठरत आहेत. गोलंदाजीतील ही उणीव दूर करण्यासाठी फलंदाजांकडून मोठ्या खेळीची अपेक्षा राहील. जडेजा व अक्षर पटेल नवे असल्याने फलंदाजीवर अधिक विसंबून राहावे लागणार आहे. अश्विनकडून काही अपेक्षा असतील, पण पॉवरप्लेमध्ये ईशांतने धावा रोखायला हव्या, असे मत राजूने व्यक्त केले.(वृत्तसंस्था)