भारत-पाक मालिकेसाठी अनुकूल वातावरण नाही : ठाकूर
By Admin | Updated: October 25, 2015 23:56 IST2015-10-25T23:56:45+5:302015-10-25T23:56:45+5:30
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी अद्याप अनुकूल वातावरण नाही. या मालिकेपूर्वी चांगली वातावरणनिर्मिती होणे

भारत-पाक मालिकेसाठी अनुकूल वातावरण नाही : ठाकूर
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट मालिकेसाठी अद्याप अनुकूल वातावरण नाही. या मालिकेपूर्वी चांगली वातावरणनिर्मिती होणे
गरजेचे आहे, असे मत बीसीसीआयचे सचिव अनुराग ठाकूर यांनी आज व्यक्त केले.
संसद सदस्य आणि सेलिब्रेटी यांच्यातील क्रिकेट सामन्यावेळी अनौपचारिक बोलताना ठाकूर म्हणाले, की सध्या दोन्ही देशांदरम्यान क्रिकेट खेळण्याइतपत वातावरण चांगले नाही, पाकिस्तान सरकारने पहिल्यांदा भारत सरकारबरोबर चर्चा करायला हवी, यातून अनुकूल वातावरणनिर्मितीला चालना मिळेल. त्यानंतर मग दोन्ही देशांतील क्रिकेट मंडळांना चर्चेसाठी जास्त त्रास घ्यावा लागणार नाही.
पंंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ठाकूर यांनी या वेळी धन्यवाद दिले. ते म्हणाले, भारत आणि दक्षिण आफ्रिका मालिकेचे महत्त्व पंतप्रधानांनी ‘मन की बात’ या आपल्या कार्यक्रमातून व्यक्त केल्याबद्दल त्यांचा आभारी आहे.
संसद सदस्य आणि सेलिब्रेटी यांच्यातील क्रिकेट सामन्यात शतकी खेळी करणाऱ्या ठाकूर यांनी संयोजकांचे आभार मानले. या सामन्यातून मिळणारी रक्कम पंतप्रधान निधीत जमा करण्यात येणार आहे.
(वृत्तसंस्था)