शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्र केसरीच्या वादावर पडदा पडणार, सांगलीत पृथ्वीराज मोहोळ-शिवराज राक्षे पुन्हा भिडणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 18:07 IST

विटा : ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा वाद मिटविण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा ...

विटा : ‘महाराष्ट्र केसरी’ स्पर्धेचा वाद मिटविण्यासाठी डबल महाराष्ट्र केसरी मल्ल चंद्रहार पाटील यांनी पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्र केसरीचा विजेता मल्ल पृथ्वीराज मोहोळ व उपविजेता मल्ल शिवराज राक्षे या दोघांनी पुन्हा एकदा लढण्यासाठी तयार असल्याचे सांगितले आहे. या पार्श्वभूमीवर पै. चंद्रहार पाटील यांनी ही स्पर्धा लवकरच सांगली येथे घेणार असून या दोघांत पुन्हा कुस्ती लावून ‘महाराष्ट्र केसरी’चा सुरू असलेला वाद सांगलीत मिटविणार असल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही मल्लांना प्रत्येकी २५ लाख रुपयांचे बक्षीस देण्याचे त्यांनी जाहीर केले आहे.महाराष्ट्र केसरीची स्पर्धेत पंचानी चुकीचा निर्णय दिल्याचा आरोप करत संतप्त शिवराज राक्षे याने पंचाला लाथ मारली. या प्रकारानंतर डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी राक्षेच्या कृतीचे समर्थन करीत पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत, असे विधान करीत महाराष्ट्र केसरीच्या दोन्ही गदा मी परत करणार असल्याचे जाहीर केले.दरम्यान महाराष्ट्र केसरी मल्ल पृथ्वीराज मोहोळ याने पै. शिवराज राक्षे याच्यासोबत पुन्हा एकदा कुस्तीची लढत द्यावी, अशी मागणी होऊ लागली. यावर दोघांनीही महाराष्ट्र केसरीसाठी पुन्हा लढण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी या दोन्ही मल्लांची सांगलीत कुस्ती लावण्याची तयारी केली आहे.

पै. पृथ्वीराज मोहोळ व पै. शिवराज राक्षे या दोघांची कुस्ती पुन्हा सांगलीत लावणार आहे. निर्विवाद कुस्ती कशी असते हे मी महाराष्ट्राला दाखवून देणार आहे. या कुस्तीसाठी मी स्वत: वैयक्तिक मोहोळ व राक्षे याला प्रत्येकी २५ लाख रुपये देणार आहे. या दोघांत निर्विवाद कुस्ती झाल्यानंतर महाराष्ट्राचा वाद सांगलीत मिटणार आहे. - पै. चंद्रहार पाटील, डबल महाराष्ट्र केसरी. 

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत कोणताही वाद नाही. मी माझे काम केले आहे. प्रशिक्षक व वस्ताद यांनी शिकवल्याप्रमाणे मी कुस्ती करून महाराष्ट्र केसरी झालो. मी पैलवान आहे. पैलवान हा योद्धा असतो. त्याला त्याचे काम करायचे आहे. परत जरी कुस्ती करायची असली तरी ही कुस्ती कधीही व कोठेही घेतली तरी चालेल. त्यासाठी मी तयार आहे. - पृथ्वीराज मोहोळ, महाराष्ट्र केसरी.

टॅग्स :SangliसांगलीWrestlingकुस्तीMaharashtra Kesariमहाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धाchandrahar patilचंद्रहार पाटील