टेनिस कोर्टमध्येच तिने कात्रीने कापली स्वतःची वेणी
By Admin | Updated: October 26, 2016 12:56 IST2016-10-26T11:26:02+5:302016-10-26T12:56:46+5:30
रशियाची टेनिसस्टार स्वेतलाना कुझनेत्सोवाने डब्ल्यूटीएचा ( वुमेन टेनिस असोसिएशन) अंतिम सामना सुरू असतानाच कोर्टमध्ये स्वतःची वेणी कापली.

टेनिस कोर्टमध्येच तिने कात्रीने कापली स्वतःची वेणी
ऑनलाइल लोकमत
सिंगापूर, दि. 26 - रशियाची टेनिसस्टार स्वेतलाना कुझनेत्सोवाने डब्ल्यूटीएचा ( वुमेन टेनिस असोसिएशन) अंतिम सामना सुरू असतानाच कोर्टमध्ये स्वतःची वेणी कापली. सिंगापूरमध्ये अंतिम सामना सुरू असताना ही घटना घडली आहे. अंतिम सामन्यादरम्यान स्वेतलाना विरोधी स्पर्धक आणि गतवर्षाची विजेती पोलंडची एग्निएझ्का रोद्वान्स्काहून 1-2नं पिछाडीवर होती. जिंकण्याचेच उद्देश डोळ्यासमोर ठेवलेल्या स्वेतलाना यावेळी अंपायरकडे एक ब्रेक देण्याची विनंती केली, यानंतर कोर्टवर कात्री मागवून वेणीचा काही भाग तिने तिथल्या तिथे कापला.
स्वेतलानाने कोर्टातच स्वतः केस कापत असल्याचे पाहून सर्वजण हैराण झाले. यानंतर जरासाही क्षणाचा विलंब न लावता तिने पुन्हा खेळ सुरू केला आणि सर्वांना आश्चर्यचकित करत तिने स्पर्धेत दमदार पुनरागमन केले, आणि रोद्वान्स्काला 7-5, 1-6 आणि 7-5 अशा सरळ सेटमध्ये नमवत विजेतेपदाला गवसणी घातली.