शहरं
Join us  
Trending Stories
1
"धरणासंदर्भात केलेल्या 'त्या' वाक्यामुळं माझं वाटोळं झालं"! अजित दादांनी 'तो' किस्सा जसाच्या तसा सांगितला
2
आता लोकसभा निवडणुकीत 'लव्ह जिहाद'ची एन्ट्री? काँग्रेस नगरसेवकाच्या मुलीच्या हत्येवरून PM मोदी बरसले
3
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
4
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
5
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
6
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
7
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
8
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
9
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
10
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
11
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
12
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
13
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
14
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
15
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
16
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
17
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
18
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
19
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
20
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"

राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत महाराष्ट्राच्या पुरुषांनी दहा वर्षांनंतर मारली बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 12:22 AM

महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले.

मुंबई - महाराष्ट्राने अपेक्षित प्रदर्शन करताना तगड्या सेनादलाचे आव्हान ३४-१९ असे परतावून ६५व्या राष्ट्रीय कबड्डी स्पर्धेत पुरुष गटाचे जेतेपद पटकावले. विशेष म्हणजे तब्बल १० वर्षांनंतर महाराष्ट्राच्या पुरुषांनी राष्ट्रीय जेतेपद जिंकले. महिलांमध्ये हिमाचल प्रदेशने धक्कादायक कामगिरी करत रेल्वेची ३२ वर्षांची विजयी परंपरा खंडित करताना जेतेपद पटकावले.हैदराबाद येथील गचिबोवली स्टेडियममध्ये झालेल्या पुरुषांच्या अंतिम सामन्यात महाराष्ट्राने मध्यंतराला १७-१२ अशी आघाडी घेतली. पण, दुसºया सत्रात सेनादलाने महाराष्ट्राला कडवी टक्कर दिली. मोनू गोयल याने एकट्याने आक्रमण व बचावात चमक दाखवत महाराष्ट्राला दबावाखाली आणले. दखल घेण्याची बाब म्हणजे हुकमी नितीन तोमरला एकही गुण मिळवता आला नाही.अंतिम काही मिनिटांमध्ये मैदानात आलेल्या तुषार पाटीलने तिन्हीवेळा तिसºया चढाईत प्रत्येकी एक गुण मिळवत महाराष्ट्राच्या जेतेपदामध्ये निर्णायक योगदान दिले. कर्णधार रिशांक देवाडिगा व गिरिश एर्नाक यांनीही तुफानी आक्रमण करताना सेनादलाची हवा काढली. महिलांच्या अंतिम लढतीत हिमाचल प्रदेशने बलाढ्य रेल्वेला ३८-२५ असे नमवून राष्ट्रीय स्पर्धेत पहिल्यांदाच जेतेपद पटकावले.

टॅग्स :Kabaddiकबड्डीMaharashtraमहाराष्ट्रSportsक्रीडा