श्रीलंकेत टीम इंडियाने पटकावली 23 पदके
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 22, 2018 11:13 IST2018-10-22T10:47:18+5:302018-10-22T11:13:04+5:30
श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या इंडो-श्रीलंका कराटे चॅम्पियन 2018 या स्पर्धेत ठाण्यातील सोनल आणि राज पाठक या भाऊ बहिणीसह मुंबईतील 12 जणांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून देशाची मान उंचावली आहे.

श्रीलंकेत टीम इंडियाने पटकावली 23 पदके
मुंबई : श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या इंडो-श्रीलंका कराटे चॅम्पियन 2018 या स्पर्धेत ठाण्यातील सोनल आणि राज पाठक या भाऊ बहिणीसह मुंबईतील 12 जणांनी उत्कृष्ट कामगिरी बजावून देशाची मान उंचावली आहे. या स्पर्धकांनी 23 पदकांची लयलूट केली आहे.
श्रीलंकेत कांडी येथील एमआय स्टेडियममध्ये झालेल्या या स्पर्धेत 526 कराटे पट्टू सहभागी झाले होते. त्यामध्ये प्रशिक्षक फराज शेख यांच्या नेतृत्वाखाली भारतातील इंटरनॅशनल इंडो-रयु कराटे - डो फेडरेशन या संघटनेचे 134 कराटेपट्टू पथक होते. या पथकाने 14 सुवर्ण, 7 रौप्य, तर 2 कांस्य अशी 23 पदके पटकावली आहेत. भारतातील पथकात सोनल पाठकने 2 सुवर्ण तर राज पाठकने 1 सुवर्ण व रौप्य पदक पटकावले. या मुलांनी उत्तम कामगिरी केल्याचे प्रशिक्षक शेख यांनी सांगितले.
भारतीय स्पर्धकांनी केलेली कामगिरी पुढीलप्रमाणे : अमोली भोसले (रौप्य), हृतिका भोसले ( 2 सुवर्ण), सोनल पाठक (2 सुवर्ण ), पंत गडा (2 सुवर्ण ), पुनांग छेडा (1 सुवर्ण, 1 रौप्य), तंझील वरेकर (2 रौप्य), आशिष शेट्टी (1 सुवर्ण, 1 कांस्य), आर्यन नायर (2 सुवर्ण), पार्थ कुलकर्णी (2 रौप्य), वेदांग कदम (2 सुवर्ण), राज पाठक (1 सुवर्ण, 1 रौप्य), प्रथमेश शिरोडकर (1 सुवर्ण, 1 कांस्य).