शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

लहरा दो...! भारत आशियाई चॅम्पियन्स; मलेशियावर रोमहर्षक विजय अन् झटका पाकिस्तानला

By ओमकार संकपाळ | Updated: August 12, 2023 22:32 IST

India vs Malaysia Hockey Asian Champions Trophy Final : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने उतरला अन् विजय साकारला.

Asian Champions Trophy Hockey 2023 | चेन्नई : आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या फायनलमध्ये भारत ट्रॉफी जिंकण्याच्या इराद्याने उतरला अन् विजय साकारला. शेवटच्या क्वार्टरपर्यंत रंगलेल्या या लढतीत यजमानांनी रोमहर्षक विजय मिळवला. आकाशदीप सिंगने भारताला जबरदस्त पुनरागमन संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. ५६ व्या मिनिटाला त्याच्या मैदानी गोलने भारताने ४-३ अशी आघाडी घेतली. पहिल्या हाफमध्ये मलेशिया ३-१ असा आघाडीवर होता. पहिल्या हाफपर्यंत ३-१ ने आघाडीवर असलेल्या मलेशियाला ताब्यात ठेवण्यात भारताला यश आले. तिसऱ्या क्वार्टरमध्ये भारताने जबरदस्त पुनरागमन करत ३-३ अशी बरोबरी साधली होती. 

भारतीय संघाने एका मिनिटात दोन गोल करत स्कोअर ३-३ असा केला. हाफ टाईमनंतरही भारताने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले. सामन्याच्या ४५व्या मिनिटाला भारताच्या काउंटर अॅटॅकवर मलेशियाला त्याच्या बॉक्समध्ये फाऊल करण्यात आले तेव्हा त्याचे फळ मिळाले. यावर रेफ्रींनी भारताला पेनल्टी स्ट्रोक दिला. यानंतर भारतीय कर्णधार हरमनप्रीत सिंगने गोल करत स्कोअर ३-२ असा केला. त्याच मिनिटाला गुरजत सिंगने काउंटर अटॅकवर मैदानी गोल करत स्कोअर ३-३ असा केला. 

अखेरच्या क्वार्टरमध्ये गोल अन् भारत चॅम्पियन

चौथ्या क्वार्टरमध्ये अर्थात शेवटची १५ मिनिटे चॅम्पियन्स कोण याचा निकाल देणारी होती. या शेवटच्या क्वार्टरमध्ये भारताने मलेशियावर ४-३ अशी आघाडी घेतली, आकाशदीपने चौथा गोल करून पाच वर्षांच्या ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. भारताने ४ वेळा आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावली. पाकिस्तानने २०१२, २०१३ व २०१८ ( भारतासह संयुक्त जेतेपद) असे तीन जेतेपद जिंकली होती.  विशेष बाब म्हणजे भारताने पहिला गोल करून श्रीगणेशा केला होता. जुगराज सिंगने नवव्या मिनिटाला गोल करत भारतीय संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यानंतर भारताची गाडी रूळावरून घसरली. पाहुण्या मलेशियाने प्रतिआक्रमण सुरूच ठेवले अन् 14व्या मिनिटाला अझराई अबू कमालने केलेल्या मैदानी गोलच्या जोरावर मलेशियाने बरोबरी साधली. यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये अठराव्या मिनिटाला रहीझ राजीने पेनल्टी कॉर्नरवर गोल केला आणि २८व्या मिनिटाला मोहम्मद अमिनुद्दीनने पेनल्टी कॉर्नरवर गोल करत आपल्या संघाला भारताविरुद्ध २-१ अशी आघाडी मिळवून दिली.

भारताला बचाव करताना अपयश येत होते. याचाच फायदा घेत मलेशियाने एकामागून एक अनेक काउंटर अटॅक केले. खरं तर भारताने अनेक सोपे पेनल्टी कॉर्नरही वाया घालवले.अशाप्रकारे मलेशियाने ३-१ अशी आघाडी कायम ठेवली आहे. पण, तिसऱ्या क्वार्टरमध्ये यजमानांनी आपल्या चाहत्यांना जागे केले. सलग दोन गोल करून भारतीय शिलेदारांनी ट्रॉफीच्या दिशेने कूच केली. 

गोल करणारे शिलेदार -

  1. जुगराज सिंग (भारत) - नववा मिनिट
  2. अबू कमला अझराई (मलेशिया) - चौदावा मिनिट
  3. राइझ रहीम (मलेशिया) - अठरावा मिनिट
  4. अमिनुद्दीन मुहम्मद (मलेशिया) - २८वा मिनिट
  5. हरमनप्रीत सिंग (भारत) - ४५वा मिनिट
  6. गुरजत सिंग (भारत)- ४५वा मिनिट
  7. आकाशदीप सिंग (भारत) - ५६वा मिनिट

जपानला धूळ चारून भारताची फायनलमध्ये धडकउपांत्य फेरीच्या सामन्यात भारताने जपानचा पराभव करून फायनलचे तिकिट मिळवले होते. जपानविरूद्धच्या पराभवासह हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वातील भारताने तब्बल पाच वर्षांनंतर आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश मिळवला. खरं तर भारताने २०११, २०१६ व २०१८ मध्ये आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीच्या उपांत्य फेरीत जपानचा धुव्वा उडवला. भारताने जपानचा तर मलेशियाने दक्षिण कोरियाचा पराभव करून फायनलचे तिकिट मिळवले होते. उपांत्य फेरीच्या सामन्यात जपानचा पराभव करताना भारताकडून, आकाशदीप सिंग ( १९ मि.) , हरमनप्रीत सिंग ( २३ मि.), मनदीप सिंग ( ३० मि.), सुमित ( ३९ मि.) आणि सेलवम कार्थी ( ५१ मि.) यांनी गोल करून भारताचा ५-० असा विजय पक्का केला. लक्षणीय बाब म्हणजे भारताच्या हॉकी संघाने अपराजित राहून अंतिम फेरीत स्थान मिळवले. 

टॅग्स :HockeyहॉकीMalaysiaमलेशियाIndiaभारत