शहरं
Join us  
Trending Stories
1
९ जुलैला भारत बंद, २५ कोटी कामगार संपावर; शाळा, कॉलेज, बँका आणि बाजारासह काय-काय बंद राहणार? जाणून घ्या
2
तिरुपतीला गेलेल्या अहिल्यानगरच्या तिघांचा दुर्वैवी मृत्यू; कार उलटल्याने झाला भीषण अपघात
3
'भारतासह ब्रिक्स देशांना द्यावा लागणार अतिरिक्त १० टक्के कर"; व्यापार करारापूर्वी ट्रम्प यांचे विधान
4
"एक स्पष्ट आदेश... पक्षातील कोणीही..."; मराठीचा मुद्दा गाजत असतानाच राज ठाकरेंची फेसबूक पोस्ट
5
"रेल्वे कर्मचाऱ्याला तमीळ येत नव्हतं, म्हणून दुर्घटना घडली", आता तामिळनाडू रेल्वे-व्हॅन अपघातातही भाषेची एन्ट्री!
6
२ कोटींच्या विम्यासाठी मित्राला गाडीत जिवंत जाळलं; नऊ महिने सुरु होती प्लॅनिंग, पत्नीचाही सहभाग
7
भारताचे INS महेंद्रगिरी शत्रूला पाणी पाजायला तयार! चीन-पाकिस्तानची झोप उडणार, काय आहे यात खास? जाणून थक्क व्हाल!
8
ठाकरे बंधूंची युती होईल का, किती टिकेल? स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वतींची मोठी भविष्यवाणी
9
मराठी शाळा बंद, ५००० शिक्षकाचं आंदोलन, मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष द्यावं- सुप्रिया सुळे
10
“ज्येष्ठ कलाकार मनमोहन माहिमकर यांना बेघर होऊ देणार नाही”; DCM एकनाथ शिंदेंनी दिली ग्वाही
11
महाराष्ट्रातील सीईटी कक्षाकडून घेण्यात येणाऱ्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ; विद्यार्थी हितासाठी निर्णय!
12
टॉप 10 अब्जाधिशांच्या यादीतून बिल गेट्स बाहेर, संपत्तीत मोठी घसरण
13
कोट्यवधी लोकांना खूशखबर, पीएफच्या खात्यात जमा झाले व्याजाचे पैसे, असा तपासा बॅलन्स
14
१४ वर्षांच्या पोराचा आणखी एक पराक्रम! आता वैभव सूर्यंवशीनं मोडला शुबमन गिलचा विक्रम
15
११ तासांत काय घडलं? अविनाश जाधव यांनी सगळं सांगितलं; अटक, सुटका ते मोर्चाची Inside Story
16
येमेनमध्ये भारतीय नर्स निमिषा प्रियाला फाशीची शिक्षा; न्यायालयाने तारीख ठरवली
17
इतके पैसे कुठून आणता? निशिकांत दुबेंचा ठाकरे बंधूंवर निशाणा; मालमत्तांची यादीच शेअर केली
18
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
19
भारतीय क्रिकेटर स्मृती मन्धानाला इंग्लंडमध्ये मिळाला 'लाल गुलाब'; फोटो व्हायरल, रंगली चर्चा
20
गोपाल खेमका हत्याकांडात मोठा गौप्यस्फोट, एका व्यावसायिकानेच दिली होती सुपारी, समोर आलं असं कारण

स्वप्निल, अंकितची रेकॉर्ड ब्रेक भागीदारी

By admin | Updated: October 15, 2016 01:44 IST

कर्णधार स्वप्निल गुगळे (३५१*) आणि अंकित बावणे (२५८*) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ५९४ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी

मुंबई : कर्णधार स्वप्निल गुगळे (३५१*) आणि अंकित बावणे (२५८*) यांनी तिसऱ्या विकेटसाठी केलेल्या नाबाद ५९४ धावांच्या विक्रमी भागीदारीच्या जोरावर महाराष्ट्राने रणजी स्पर्धेत दिल्लीविरुद्ध पहिल्या डावात २ बाद ६३५ धावांचा हिमालय उभा केला. महाराष्ट्राने आपला डाव घोषित केल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर दिल्लीने ५ षटकांत बिनबाद २१ अशी मजल मारली.वानखेडे स्टेडियमवर सुरू असलेल्या या सामन्यात महाराष्ट्राने दिल्लीवर पूर्णपणे वर्चस्व राखले. गुगळे - बावणे यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये विश्वविक्रमी भागीदारी रचली. विशेष म्हणजे श्रीलंकेच्या कुमार संगकारा - माहेला जयवर्धने यांनी २००६ साली कोलंबो येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध केलेली ६२४ धावांची सर्वाधिक धावांची भागीदारी मोडण्याची संधी गुगळे - बावणे यांना होती. परंतु, कर्णधार गुगले याने संघहिताला महत्त्व देताना डाव घोषित करण्याचा निर्णय घेतला. दखल घेण्याची बाब म्हणजे, हा विक्रम मोडण्यासाठी ही जोडी केवळ ३१ धावा दूर होती. मात्र, तरीही त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये दुसऱ्या क्रमांकाचा उच्चांक गाठला.गुगळेने ५२१ चेंडूंचा सामना करताना तब्बल ३७ चौकारांसह ५ षटकारांची आतषबाजी करून नाबाद ३५१ धावांचा तडाखा दिला, तर त्याला उपयुक्त साथ दिलेल्या बावणे याने ५०० चेंडूंमध्ये १८ चौकार व २ षटकारांसह नाबाद २५८ धावा चोपल्या. या दोघांच्या भल्यामोठ्या भागीदारीच्या जोरावर २ बाद ४१ धावा अशा प्रतिकूल प्ररिस्थितीतून महाराष्ट्राने २ बाद ६३५ धावांची भरारी घेतली. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी गुगळे - बावणे यांनी दिल्लीकर गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेताना त्यांना दिवसभरामध्ये एकही यश मिळू दिले नाही. तसेच, ही जोडी फोडण्यासाठी दिल्लीचा कर्णधार उन्मुक्त चंद याने स्वत:सह एकूण ९ गोलंदाज वापरले. मात्र, तरीही गुगळे - बावणे यांना रोखणे दिल्लीकरांना जमले नाही. (क्रीडा प्रतिनिधी)