राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या प्रवेश यादीत सुशीलकुमारचे नाव नसल्याने खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2018 11:57 IST2018-03-30T11:52:31+5:302018-03-30T11:57:17+5:30

ऑलिम्पिकमध्ये दोनवेळा पदक विजेता भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या प्रवेश यादीत नाव नसल्याचे एकच खळबळ उडाली आहे.  

Sushil Kumar was not named in Commonwealth Games' list | राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या प्रवेश यादीत सुशीलकुमारचे नाव नसल्याने खळबळ 

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या प्रवेश यादीत सुशीलकुमारचे नाव नसल्याने खळबळ 

नवी दिल्ली : ऑलिम्पिकमध्ये दोनवेळा पदक विजेता भारतीय कुस्तीपटू सुशीलकुमार याचे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या प्रवेश यादीत नाव नसल्याचे एकच खळबळ उडाली आहे.  

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या आयोजकांकडून खेळाडूंची प्रवेश यादी जाहीर करण्यात आली आहे. गोल्ड कोस्टमध्ये 4 एप्रिलपासून होणा-या राष्ट्रकुल स्पर्धेसाठी खेळाडूंची अधिकृत यादी  www.gc2018.com या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आली आहे. या यादीत कुस्तीपटू सुशीलकुमारचे नाव नाही आहे. 

टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी आयोजकांनी दिलेल्या संकेतस्थळावरील यादीत जास्तीत जास्त पुरुषांच्या 74 किलोग्रॅम फ्रीस्टाईल गटात 15 हून अधिक कुस्तीपटूंची नावे आहे. या यादीत सुशीलकुमारचे नाव नाही आहे. या गटात सुशील कुमारचे नाव 16 व्या स्थानावर पाहिजे होते. मात्र, त्यामध्ये महिला आणि पुरुषांच्या इतर फ्रीस्टाईल गटांमध्ये भाग घेणा-या जवळपास 11 भारतीय कुस्तीपटूंची नावे आहेत.

दरम्यान,  राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या प्रवेश यादीत नाव नसल्याने एकच खळबळ उडाली आहे.  



 

Web Title: Sushil Kumar was not named in Commonwealth Games' list

टॅग्स :Sportsक्रीडा