जिवंत खेळप˜ीच्या----- शब्दाचा------ उपयोगाने आश्चर्य

By Admin | Updated: March 8, 2015 00:30 IST2015-03-08T00:30:59+5:302015-03-08T00:30:59+5:30

मुंबई : जेव्हा कोणी पिचला जिवंत खेळपट्टी म्हणून जाहीर करतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते आणि या शब्दाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो, असे मत तामिळनाडूचे प्रशिक्षक वूरकेरी व्ही. रमन यांनी व्यक्त केले.

Surprised by the use of the living chest ----- word ------ | जिवंत खेळप˜ीच्या----- शब्दाचा------ उपयोगाने आश्चर्य

जिवंत खेळप˜ीच्या----- शब्दाचा------ उपयोगाने आश्चर्य

ंबई : जेव्हा कोणी पिचला जिवंत खेळपट्टी म्हणून जाहीर करतो तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटते आणि या शब्दाचा अर्थ काय आहे हे जाणून घेण्यास आपण उत्सुक असतो, असे मत तामिळनाडूचे प्रशिक्षक वूरकेरी व्ही. रमन यांनी व्यक्त केले.
गतचॅम्पियन कर्नाटक आणि तामिळनाडू यांच्यात मुंबई येथे रणजी करंडकाचा अंतिम सामना रंगत आहे. या सामन्याच्या उंबरठ्यावर रमन म्हणाले, जिवंत खेळपट्टीचा अर्थ काय आहे हे कोणी मला सांगावे, अशी माझी इच्छा आहे. जेव्हा तुम्ही वेगवान गोलंदाजीसाठी पोषक खेळपट्टीविषयी बोलतात तर स्पिनसाठी अनुकूल खेळपट्टीविषयी प्रश्नचिन्ह का निर्माण केले जाते, याचे कोणीतरी मला उत्तर द्यायला हवे.
रमन म्हणाले, भारताच्या यजमानपदाखालील कसोटी सामन्यात चेंडू लवकर स्पिन होतो तेव्हा कोणाला त्याचा त्रास नसतो; परंतु जेव्हा देशांतर्गत -----स्पर्धेत होते---- तेव्हा प्रश्न विचारले जातात.
तटस्थ ठिकाणी सामने खेळण्याविषयी आपला अनुभव चांगला नसल्याचेही रमनने सांगितले. तो म्हणाला, तटस्थ स्थळाविषयीचा माझा अनुभव खूपच खराब आहे. जेव्हा पाऊस पडतो तेव्हा मैदानातील कर्मचारी चहाच्या कपाचा उपयोग करून कव्हरवरून पाणी बाहेर काढतात आणि ज्या ठिकाणी ते पाणी फेकतात तेथे कव्हर्समधील क्षेत्ररक्षक उभा राहणार असतो. याविषयी तुम्ही काय म्हणू शकतात, तटस्थ स्थळी असेच होते.

Web Title: Surprised by the use of the living chest ----- word ------

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.