शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

हायकोर्टाच्या आदेशास सुप्रीम कोर्टाची स्थगिती

By admin | Updated: February 11, 2015 01:36 IST

यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांचे लाइव्ह फिड दूरदर्शनच्या माध्यमातून खासगी केबल आॅपरेटर्सला पुरविण्याच्या प्रसार भारतीच्या निर्णयास बंदी

नवी दिल्ली : यंदाच्या क्रिकेट विश्वचषकातील सामन्यांचे लाइव्ह फिड दूरदर्शनच्या माध्यमातून खासगी केबल आॅपरेटर्सला पुरविण्याच्या प्रसार भारतीच्या निर्णयास बंदी घालणाऱ्या दिल्ली उच्च न्यालयाच्या निर्णयास मंगळवारी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिली. विश्वचषकाच्या प्रक्षेपणाचे हक्क केवळ ईएसपीएन- स्टार स्पोर्ट्सकडे आहेत.न्या. रंजन गोगोई आणि न्या. पिनाकी चंद्रा घोष यांच्या पीठाने या प्रकरणी पुढील सुनावणीची तारीख १७ फेब्रुवारी निश्चित केली. शिवाय, अंतरिम आदेशात ‘दरम्यान, हायकोर्टाच्या आदेशास स्थगिती देताना खासगी वाहिन्या आणि बीसीसीआयला हा वाद सोडविण्यासाठी आपापले प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले.’ बीसीसीआय आणि स्टार इंडिया लिमिटेडला बजावलेल्या नोटीसमध्ये या प्रकरणी सविस्तर सुनावणी होण्याची आवश्यकता असल्याचे म्हटले आहे. न्यायालयाच्या या टिपणीवर चिदंबरम म्हणाले, ‘खासगी चॅनेलच्या हितावर स्थगिती दिल्यामुळे त्यांचे आर्थिक नुकसान होईल. कारण, विश्वचषक १४ फेब्रुवारीपासून सुरू होत आहे.’ यावर न्यायमूर्ती म्हणाले, ‘सात वर्षांपासून हीच व्यवस्था असल्याने सात आठवडे प्रतीक्षा केल्यास काही बिघडणार नाही. विश्वचषकाचे आयोजन होत राहणार आहे. आमचा निर्णय मात्र नेहमीसाठीच राहणार आहे. जे आर्थिक नुकसान होईल, ते भरून निघेल. आम्ही तुमचे ऐकून घेऊ. योगायोगाने विश्वचषक आणि हे प्रकरण एकाच वेळी पुढे आहे.’सुप्रीम कोर्टाने आधीच स्पष्ट केले, की आम्ही केवळ दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देऊ इच्छितो. शिवाय, नोटीस देणार आहोत. प्रकरणाची सुनावणी सहा ते सात आठवड्यानंतर करू.’ सध्या तरी २००७ची स्थिती कायम राहील. दूरदर्शनला नि:शुल्क फिड देण्याची व्यवस्था गेल्या सात वर्षांपासून आहे. हीच व्यवस्था पुढेही सुरू राहील.केंद्र शासनाच्या वतीने अर्टनी जनरल मुकुल रोहतगी यांना युक्तिवादाची गरज भासली नाही. त्यांनी न्यायमूर्र्तींच्या टिप्पणीवर सहमती दर्शविली. १७ फेब्रुवारी रोजी पुढील सुनावणी होणार आहे.२०१५च्या क्रिकेट विश्वचषकातील थेट प्रक्षेपण डीडी चॅनेल्सच्या माध्यमातून खासगी केबल आॅपरेटर्सना पुरविण्यास दिल्ली हायकोर्टाने जी स्थगिती दिली, त्या निर्णयाला प्रसारभारतीने सुप्रीम कोर्टात आव्हान दिले होते. (वृत्तसंस्था)