शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणमध्ये तख्त पालटले...! इस्लामिक रिव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्सने घेतला देशाचा ताबा; अब्बास अराघची बाजुला पडले 
2
नाशिक TCS प्रकरण: निदा खान बेपत्ता, जामीन अर्जावर कोर्टात काय घडले? 
3
नेपाळमध्ये राहणं झालं महाग! बालेन सरकारचा 'तो' एक नियम आणि ५० लाख मधेशींची झोप उडाली!
4
TCS कांड: "'प्लेयर', 'झिरो फिगर', तुझ्या शारीरिक गरजा...!" शाहरुख, रजा, आसिफच्या कृत्यानं पीडिता हादरली; एकदा तर...
5
Video: धावत्या ट्रॅव्हलमध्ये शिरला, चालकाला सपासप कानाखाली मारल्या; नवी मुंबईत आरटीओ अधिकाऱ्याची दबंगगिरी 
6
Deepa Bhati : 'ती' जिंकली! ३ मुलांची आई लग्नाच्या १८ वर्षांनंतर झाली अधिकारी; टोमणे मारणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर
7
छत्तीसगडमध्ये चार्टर्ड विमान डोंगररांगांना धडकले; विमानाचा भीषण स्फोट, Video...
8
पॅन कार्डचा खेळ अन् डिलिव्हरी बॉयचं आयुष्य झालं नरक; ९.५ कोटींच्या कंपनीचा मालक पाहून पोलीसही चक्रावले!
9
जपानच्या किनाऱ्यावर बोटींची पळापळ...! खोल समुद्रात जाण्यासाठी एकामागोमाग एक, मोठी रांग,  १० फूट उंच त्सुनामीचा इशारा
10
तीन वर्षाच्या लेकीचा होता वाढदिवस, आई वडिलांसह चिमुकलीचा घरात मिळाला मृतदेह; पोलिसांनी सांगितलं काय घडलं? 
11
Video - हौसेला मोल नाही! ७४ वर्षांच्या 'आजी'चा स्वॅग; न घाबरता केलं पॅराग्लाइडिंग, म्हणाल्या...
12
Jammu Accident : २१ निष्पापांचा बळी घेणाऱ्या 'त्या' बसवर होते ८ चालान; उधमपूर अपघाताची इनसाईड स्टोरी!
13
जर्मनीसोबत ₹९०,००० कोटींचा संरक्षण करार; भारतासाठी का महत्वाचा आहे Project-75I..?
14
MI Playoff Scenario : मुंबई इंडियन्स प्लेऑफ्सच्या शर्यतीत टिकेल? जाणून घ्या त्यांच्यासमोरील समीकरण?
15
IPL 2026: वैभव सूर्यवंशी खरंच रडला? सामना संपल्यानंतरच्या एका Video मुळे रंगलीये तुफान चर्चा
16
कामाची गोष्ट! तुम्हीही फोनच्या कव्हरमध्ये पैसे ठेवता? आताच व्हा सावध, सवय ठरेल जीवघेणी
17
सुभाषचंद्र बोस यांना 'राष्ट्रपुत्र' म्हणून घोषित करण्यात यावे! याचिकेवर सर्वोच्च न्यायालय संतप्त; म्हणाले...
18
Dharashiv Crime: 'तुझा काटाच काढतो', २० वर्षाच्या सुजितची काकानेच जमिनीच्या वादातून केली हत्या
19
"बायडन असो वा ट्रम्प, अमेरिकेचं वागणं सारखंच"; इराणने झिडकारला चर्चेचा प्रस्ताव; नेमकं कारण काय?
20
Numerology: शांत, अबोल तरी आत्मविश्वासाने परिपूर्ण असतात 'या' जन्मतारखेच्या व्यक्ती; पण....
Daily Top 2Weekly Top 5

‘प्ले आॅफ’पूर्वी पंजाबविरुद्ध सनरायझर्स हैदराबादची लढत

By admin | Updated: May 15, 2016 04:33 IST

सनरायझर्स हैदराबादला मागच्या सामन्यात दिल्लीने पराभवाची चव चाखविल्यानंतर ‘प्ले आॅफ’मध्ये स्थान निश्चितीसाठी आज रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबला नमविण्याचे आव्हान हैदराबादपुढे असेल.

मोहाली : आघाडीचे स्थान पटकविणाऱ्या सनरायझर्स हैदराबादला मागच्या सामन्यात दिल्लीने पराभवाची चव चाखविल्यानंतर ‘प्ले आॅफ’मध्ये स्थान निश्चितीसाठी आज रविवारी किंग्ज इलेव्हन पंजाबला नमविण्याचे आव्हान हैदराबादपुढे असेल.आतापर्यंत खराब कामगिरी करणाऱ्या पंजाबने मुंबईला पराभूत करीत फॉर्ममध्ये आल्याचे संकेत दिल्याने हैदराबादसाठी धोक्याची घंटा आहे. ११ पैकी चार सामन्यांत पराभूत झालेल्या पंजाबने मुंबईला सात गड्यांनी चकविले होते. पंजाब घरच्या मैदानावर खेळणार असल्याने डेव्हिड वॉर्नरच्या नेतृत्वाखालील हैदराबादला सावध पवित्रा घ्यावा लागेल. स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंत वॉर्नरचे स्थान आहे. शिखर धवनही चांगले योगदान देत आहे. मधल्या फळीत केन विलियम्सन, दीपक हुड्डा आणि यष्टिरक्षक नमन ओझा; तसेच स्थानिक खेळाडू युवराजसिंग यांच्यावर हैदराबादच्या विजयाची धुरा राहील. या संघाची गोलंदाजी प्रभावी ठरली. भुवनेश्वर, आशिष नेहरा, मुस्तफिजूर रहमान, बरिंदर सरन हे टिच्चून मारा करीत आहेत. पंजाबने अद्याप आयपीएलचे जेतेपद पटकाविलेले नाही. मुंबईवर चमकदार विजय नोंदविताच संघाकडून चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या; पण दुसरीकडे विजयापूर्वीच हा संघ वादाच्या भोवऱ्यात सापडला. आरसीबीकडून एका धावेने पराभूत झाल्यानंतर संघ व्यवस्थापनाचे कोचशी मतभेद झाल्याचे वृत्त पसरले. या सर्वांमध्ये कर्णधारपद आल्यानंतर मुरली विजयने चांगली कामगिरी केली. (वृत्तसंस्था)किंग्ज इलेव्हन पंजाब : डेव्हिड मिलर (कर्णधार), कायल अ‍ॅबोट, मोहित शर्मा, मिचेल जॉन्सन, ग्लेन मॅक्सवेल, मनन व्होरा, मुरली विजय, ऋषी धवन, शॉन मार्श, वृद्धिमान साहा, गुरकीरतसिंग मान, संदीप शर्मा, अक्षर पटेल, मार्क्स स्टोइनिस, अनुरितसिंग, शार्दूल ठाकूर, फरहान बेहार्डीन, के. सी. करिअप्पा, अरमान जाफर, प्रदीप साहू, स्वप्निल सिंग.सनरायझर्स हैदराबाद : शिखर धवन (कर्णधार), युवराजसिंग, आशिष नेहरा, डेव्हिड वॉर्नर, भुवनेश्वर कुमार, ट्रेंट बोल्ट, कर्ण शर्मा, इयान मॉर्गन, मुस्तफिजूर रहमान, आदित्य तरे, बरिंदर सरन, मोझेस हेन्रिक्स, केन विल्यमसन, नमन ओझा, अभिमन्यू मिथुन, आशिष रेड्डी, विपुल शर्मा, सिद्धार्थ कौल, रिकी भुई, बेन कटिंग, विनय शंकर व टी. सुमन.