सुनील छेत्रीचा धमाका, पुनरागमनात केला गोल! भारताला १२ सामन्यांनंतर अखेर मिळाला विजय
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 10:12 IST2025-03-20T10:10:02+5:302025-03-20T10:12:26+5:30
Sunil Chhetri, Indian Football: निवृत्ती मागे घेत केलं छेत्रीचे जबदस्त 'कमबॅक'; भारताने मालदीवला ३-० असे नमवले

सुनील छेत्रीचा धमाका, पुनरागमनात केला गोल! भारताला १२ सामन्यांनंतर अखेर मिळाला विजय
Sunil Chhetri, Indian Football: शिलॉग: दिग्गज फुटबॉलपटू सुनील छेत्रीने आंतररष्ट्रीय निवृत्ती मागे घेत दिमाखदार पुनरागमन केले. त्याने भारताच्यामालदीवविरुद्धच्या शानदार विजयात एक गोल करत आपला दर्जा पुन्हा एकदा दाखवून दिला. बुधवारी झालेल्या मैत्री सामन्यात भारतानेमालदीवला ३-० असे नमवले.
Three headers get the job done for India in Shillong! 🇮🇳💙#INDMDV#BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/ZiD5VuJWub
— Indian Football Team (@IndianFootball) March 19, 2025
या शानदार विजयासह भारताची सलग १२ सामन्यांपासून सुरू असलेली पराभवाची मालिकाही खंडीत झाली. भारताने आक्रमक खेळ करत मालदीवला दडपणात ठेवले. ३५ व्या मिनिटाला राहुल भेकेने शानदार गोल करत आघाडी मिळवून दिल्यानंतर लिस्टन कोलाको याने ६६ व्या मिनिटाला गोल करत भारताची आघाडी २-० अशी भक्कम केली. यानंतर ४० वर्षीय छेत्रीने अप्रतिम कौशल्य सादर करताना ७७ व्या मिनिटाला गोल करत भारताचा विजय स्पष्ट केला. हा छेत्रीचा ९५ वा आंतरराष्ट्रीय गोल ठरला.
.@chetrisunil11 slams his 95th goal as India outplay Maldives 💙
— Indian Football Team (@IndianFootball) March 19, 2025
Read 🇮🇳🆚🇲🇻Match Report 👉https://t.co/BJQWWeGMHI#INDMDV#BlueTigers 🐯 #IndianFootball ⚽ pic.twitter.com/tQVznnZrVC
हा भारताचा गेल्या १६ सामन्यांतील पहिला विजय ठरला, हे विशेष. याआधी भारताने नोव्हेंबर २०२३ मध्ये २०२६ सालच्या फिफा विश्वचषक पात्रता फेरी सामन्यात कुवेतविरुद्ध १-० असा आपला अखेरचा विजय मिळवला होता.