शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
2
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
3
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
4
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
5
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
6
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
7
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
8
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
9
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
10
KL Rahul ची रेकॉर्ड ब्रेकींग खेळी! राजस्थान रॉयल्ससमोर उभे केले तगडे आव्हान 
11
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
12
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
13
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
14
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
15
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
16
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
17
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
18
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
19
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
20
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका

French Open 2021 Final : सामन्याच्या पाच मिनिटांआधी कुटुंबातील व्यक्तीचं झालं निधन, तरीही तो कोर्टवर उतरला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 1:08 PM

Stefanos Tsitsipas French Open 2021 Final सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) दुसऱ्यांदा फ्रेच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर केले.

सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचनं ( Novak Djokovic) दुसऱ्यांदा फ्रेच ओपन स्पर्धेचे जेतेपद नावावर केले. अंतिम सामन्यात ग्रीसच्या स्टेफानोस त्सिस्तीपास ( Stefanos Tsitsipas ) याच्याकडून त्याला कडवी टक्कर मिळाली, परंतु 0-2 अशा पिछाडीवरून नोव्हाकनं कमबॅक केलं अन् अंतिम सामना 6-7 ( 6/8), 2-6, 6-3, 6-2, 6-4 असा जिंकला. नोव्हाकचे हे 19वे ग्रँड स्लॅम जेतेपद ठरले. पण, प्रथमच ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी खेळणाऱ्या स्टेफानोसवर सामना सुरू होण्याच्या पाच मिनिटांआधी दुःखाचा डोंगर कोसळला. कोर्टवर उतरण्यापूर्वी त्याला आजीचे निधन झाल्याची बातमी समजली. तरीही 22 वर्षीय स्टेफानोस कोर्टवर उतरला अन् जगातील अव्वल खेळाडूला विजयासाठी झुंजवले. ( Greek tennis star Stefanos Tsitsipas has revealed that he learned of his grandmother’s death just minutes before his  French Open final)

स्टेफानोसनं इस्टाग्रामवर पोस्ट लिहून ही दुःखद घटना सांगितली. तो म्हणाला,कोर्टवर दाखल होण्याच्या पाच मिनिटांपूर्वी माझ्या आजीनं मृत्यूशी झुंज हरल्याची बातमी मला समजली. आयुष्यात तिच्याइतका माझा कोणावर विश्वास नव्हता. तिनं दिलेल्या प्रेमाची माझ्या आयुष्यातील इतर कोणत्याच व्यक्तीसोबत तुलना होऊ शकत नाही. जगाला तिच्यासारख्या व्यक्तींची गरज आहे, कारण तिच्यामुळे जगण्याची प्रेरणा मिळते. तुम्हाला स्वप्न पाहण्याचं बळ मिळतं. ''  

टॅग्स :TennisटेनिसNovak Djokovicनोव्हाक जोकोव्हिच