शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

राज्यस्तरीय कॅरम स्पर्धा: निलांश, अमिन व प्रथम अजिंक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: November 28, 2019 5:31 PM

निलांश चिपळूणकरने मुंबईच्याच मिहीर शेखचा ४-२५, २५-४, २५-८ असा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले.

मुंबई : क्रीडा व युवक संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत जिल्हा क्रिडा परिषद, जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालय, सांगली यांच्या विद्यमाने आयोजित मानाची व प्रतिष्ठेची राज्यस्तरीय आंतरशालेय कॅरम स्पर्धेच्या मुले ऐकरीच्या विविध तीन गटांतील (१४, १७ व १९ वर्षाखालील मुले) विजेते अनुक्रमे मुंबईचा निलांश चिपळूणकर, अमिन अख्तर अहमद व प्रथम करिहार (नागपूर) यांनी विजेतेपद पटकाविले. ही स्पर्धा  जिल्हा क्रिडा संकुल, पॅवेलियन इमारत, सांगली-मिरज रोड, सांगली येथे महाराष्ट्र कॅरम असोसिएशनच्या सहकार्याने खेळविण्यात आली. या स्पर्धेला मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, औरंगाबाद, लातूर, पुणे व यजमान कोल्हापूर विभागातील विविध जिल्हयातून २०० खेळाडू,  मुले व पंच यांच्या उत्स्फूर्त सहभाग लाभला.

मुले एकेरीच्या १४ वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या तीन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या वनिता विश्राम हायस्कूल खेतवाडीचा विद्यार्थी निलांश चिपळूणकरने मुंबईच्याच मिहीर शेखचा ४-२५, २५-४, २५-८ असा पराभव करून विजेतेपदावर पहिल्यांदाच आपले नाव कोरले. मुंबईच्या मिहीर शेखने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत पाच बोर्डात २५-४ अशी निलांश चिपळूणकरवर मात करत १-० अशी आघाडी घेतली. दुसऱ्या गेममध्ये निलांशने शांतचित्ताने आक्रमक व बचावात्मक खेळाचे प्रदर्शन करत ६ बोर्डात २५-४ असा जिंकून १-१ ने बरोबरी केली. निर्णायक तिसऱ्या गेममध्ये निलांशने ४ बोर्डापर्यंत १२-८ अशी आघाडी घेतली. नंतरचे दोन बोर्ड ८ आणि ५ गुण घेऊन २५-८ असा जिंकून विजेतेपदावर आपले नाव कोरून वर्चस्व सिद्ध केले. तत्पूर्वी झालेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यात वनिता विश्राम हायस्कूल, खेतवाडीचा विद्यार्थी निलांश चिपळूणकरने नाशिकच्या आयान पिरजादेचा सरळ दोन गेममध्ये एकतर्फी विजय मिळवित २५-१, २५-११ असा धुव्वा उडवित अंतीम फेरी गाठली. दुसऱ्या उपांत्य फेरीच्या सामन्यात मुंबईच्या मिहीर शेखने अमरावतीच्या सुरज गायकवाडचा तीन गेम रंगलेल्या संघर्षपूर्ण लढतीत १०-२५, २५-११, २५-२२ असे जिंकून अंतीम फेरीत प्रवेश मिळविला.

 

मुले एकेरीच्या १७ वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या दाने गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत नागपूरच्या अमीन अख्तर अहमदने मुंबईच्या निरज कांबळेचा २५-१२, २५-७  असा सहज पराभव करून विजेतेपदावर आपले नाव कोरून वर्चस्व सिद्ध केले.

मुले एकेरीच्या १९ वर्षाखालील गटाच्या अंतीम फेरीच्या सामन्यात नागपूरच्या प्रथम करिहारने दोन गेम रंगलेल्या अटीतटीच्या लढतीत मुंबईच्या जयेश जाधवचा २५-१९, २५-२० असा संघर्षपूर्ण विजय मिळवून विजेतेपदाला गवसणी घातली.  

धर्म पुरी, तामिलनाडू या ठिकाणी होणाऱ्या राष्ट्रीय शालेय कॅरम स्पर्धेमध्ये १४, १७ व १९ वर्षाखालील मुले महाराष्ट्र राज्याच्या प्रतिनिधित्व करणाऱ्या खेळाडूंची नावे खालीलप्रमाणे आहेत :

१४ वर्षाखालील मुले : १) निलांश चिपळूणकर (मुंबई), २) मिहीर शेख (मुंबई), ३) सूरज गायकवाड (अमरावती), ४) अयान पिरजादे (नाशिक), ५) सार्थ मोरे (मुंबई), ६) याशिन अख्तर (नागपूर)

१७ वर्षाखालील मुले : १) अमीन अख्तर अहमद (नागपूर), २) निरज कांबळे (मुंबई),                  ३) प्रमोद वैद्य (पुणे), ४) सार्थक नागावकर (मुंबई), ५) ओजस जाधव (मुंबई), ६) श्रीकांत निखारे (नागपूर)

१९ वर्षाखालील मुले : १) प्रथम करिहार (नागपूर), २) जयेश जाधव (मुंबई), ३) अदनाम शेख (पुणे), ४) शुभम मोरकर (नागपूर), ५) गौरिश रोडेकर (मुंबई), ६) तपन देशमुख (कोल्हापूर).

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्र