स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत नाशिकमध्ये आजपासून रंगणार राज्य कबड्डीचा थरार!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2018 15:28 IST2018-10-31T15:28:35+5:302018-10-31T15:28:49+5:30
नाशिक येथील सिन्नर येथे आजपासून "६६व्या वरिष्ठ गट पुरुष- महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी" कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे.

स्टार खेळाडूंच्या अनुपस्थितीत नाशिकमध्ये आजपासून रंगणार राज्य कबड्डीचा थरार!
मुंबई : नाशिक येथील सिन्नर येथे आजपासून "६६व्या वरिष्ठ गट पुरुष- महिला राज्य अजिंक्यपद निवड चाचणी" कबड्डी स्पर्धेचा थरार रंगणार आहे. यजमान नाशिक विरुद्ध रत्नागिरी, पुणे विरुद्ध बीड, जालना विरुद्ध हिंगोली, कोल्हापूर विरुद्ध पालघर या पुरुषांतील, तर नाशिक विरुद्ध परभणी, पालघर विरुद्ध लातूर या महिलांतील सामन्याने स्पर्धेचे रणशिंग फुंकले जाणार आहे.
महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनच्या मान्यनेते नाशिक जिल्हा कबड्डी, जिल्हा परिषद नाशिक व सह्याद्री युवा मंच-सिन्नर यांच्या सहकार्याने 4 नोव्हेंबरपर्यंत ही स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. सिन्नर- नाशिक येथील आडवा फाटा मैदानावर हे सामने होणार आहेत. महाराष्ट्रातील 40 ते 45 खेळाडू सध्या प्रो-कबड्डीच्या स्पर्धेत खेळत असल्यामुळे या स्पर्धेत चुरस पहावयास मिळेल. पुण्याचे सिद्धार्थ देसाई, विकास काळे, विराज लांडगे, अक्षय जाधव आदी खेळाडू या वेळी पुण्यात नसणार, त्यामुळे पुण्याचा या स्पर्धेत कस लागणार आहे. नितीन मदने सांगलीकरिता उपलब्ध असल्यामुळे त्याच्या अनुभवाचा फायदा सांगलीकर कसा उठवतात यावर त्यांचे यशापयश अवलंबून आहे.
या स्पर्धेसाठी मुंबईचे संघ
पुरुष संघ :- १)सुदेश कुळे - संघनायक; २)जितेश सापते; ३)संकेत सावंत; ४)अजिंक्य कापरे; ५)विजय दिवेकर; ६)सुशांत साईल; ७)धीरज उतेकर; ८)ओमकार जाधव; ९)पंकज मोहिते; १०)ओमकार देशमुख; ११)सिद्धेश सावंत; १२)मयूर खामकर
महिला संघ :- १)पौर्णिमा जेधे - संघनायिका; २)पूजा यादव; ३)साक्षी रहाटे; ४)ऋतुजा बांदिवडेकर; ५)प्रतीक्षा तांडेल; ६)प्रियंका कदम; ७)तेजश्री चौगुले; ८)श्रुती शेडगे; ९)मेघा कदम; १०) धनश्री पोटले; ११)श्रद्धा कदम; १२) तेजश्री सारंग.