सेंट जोसेफला विजेतेपद

By Admin | Updated: September 30, 2014 21:39 IST2014-09-30T21:39:36+5:302014-09-30T21:39:36+5:30

सोलापूर: जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित 17 वर्षांखालील शालेय विनू मंकड चषक क्रिकेट स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूलने विजेतेपद पटकावल़े सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेल्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफ हायस्कूलने सिद्धेश्वर प्रशालेवर एक चेंडू शिल्लक राखून विजय नोंदविला़ प्रथम फलंदाजी करताना सेंट जोसेफने 12 षटकात 73 धावा केल्या़ यात नोएल कोबाळकर 27 तर मधुर झंवरने 17 धावा केल्या़ प्रत्युत्तरात सिद्धेश्वर प्रशालेने 12 षटकात 73 धावा केल्या़ त्यामुळे सामना बरोबरीत सुटला़ सामना सुपर ओव्हरमध्ये गेला़ सुपर ओव्हरमध्ये सिद्धेश्वर प्रशालेने एका षटकात 10 धावा केल्या़ सामना जिंकण्यासाठी सेंट जोसेफला 11 धावांची गरज होती़ ते त्याने एक चेंडू शिल्लक राखून पूर्ण केल़े

St. Joseph's title | सेंट जोसेफला विजेतेपद

सेंट जोसेफला विजेतेपद

लापूर: जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालयाच्या वतीने आयोजित 17 वर्षांखालील शालेय विनू मंकड चषक क्रिकेट स्पर्धेत सेंट जोसेफ हायस्कूलने विजेतेपद पटकावल़े सुपर ओव्हरमध्ये पोहोचलेल्या अंतिम सामन्यात सेंट जोसेफ हायस्कूलने सिद्धेश्वर प्रशालेवर एक चेंडू शिल्लक राखून विजय नोंदविला़ प्रथम फलंदाजी करताना सेंट जोसेफने 12 षटकात 73 धावा केल्या़ यात नोएल कोबाळकर 27 तर मधुर झंवरने 17 धावा केल्या़ प्रत्युत्तरात सिद्धेश्वर प्रशालेने 12 षटकात 73 धावा केल्या़ त्यामुळे सामना बरोबरीत सुटला़ सामना सुपर ओव्हरमध्ये गेला़ सुपर ओव्हरमध्ये सिद्धेश्वर प्रशालेने एका षटकात 10 धावा केल्या़ सामना जिंकण्यासाठी सेंट जोसेफला 11 धावांची गरज होती़ ते त्याने एक चेंडू शिल्लक राखून पूर्ण केल़े
सेंट जोसेफच्या नोएल कोबाळकरने एक शानदार षटक मारत संघाला विजय मिळवून दिला़
विजयी संघ-
मधुर झंवर, नोएल कोबाळकर, यशराज शिर्के, रोहन काटकर, र्शीकांत रव्वा, वल्लभ घोडके, अमेय बाळके, गंधार देवस्थळी, आदिश शहा, सोमेश आसापूरकर, किरण चव्हाण, रोहित तापडिया, प्रयाग चिट्याल, अमेय आकेऩ
या खेळाडूंना क्रीडा मार्गदर्शक राजेंद्र गोटे, सहायक प्रशिक्षक नीलेश गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभल़े त्यांचे मुख्याध्यापक रेव्हरंड फादर सायमन डिसुझा यांनी कौतुक केल़े
फोटो ओळी-
शालेय विनू मंकड चषक क्रिकेट स्पर्धेतील विजेत्या सेंट जोसेफ हायस्कूलच्या संघासोबत मुख्याध्यापक रेव्हरंड फादर सायमन डिसुझा, राजेंद्र गोटे, नीलेश गायकवाड़

Web Title: St. Joseph's title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.