एसएसआय, दीपक संघांची विजयी सलामी

By Admin | Updated: December 6, 2015 02:07 IST2015-12-06T02:07:07+5:302015-12-06T02:07:07+5:30

सोलापूर: पापय्या तालीम संघ व सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार्क क्रीडांगणावर आयोजित टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत एसएसआय ब व दीपक क्रिकेट क्लबच्या संघांनी विजयी सलामी दिली़ एसएसआय ब संघाने फ्रेंड्स क्रिकेट क्लबवर तीन विकेट्स शिल्लक राखून विजयी सलामी दिली़ फ्रेंड्स क्रिकेट क्लबने 20 षटकांत सर्वबाद 133 धावा केल्या़ प्रत्युत्तरात एसएसआय ब संघाने 18 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा काढून तीन विकेट्सने विजय मिळवला़

SSI, Deepak Sangh's winning salute | एसएसआय, दीपक संघांची विजयी सलामी

एसएसआय, दीपक संघांची विजयी सलामी

लापूर: पापय्या तालीम संघ व सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने पार्क क्रीडांगणावर आयोजित टी-20 लेदरबॉल क्रिकेट स्पर्धेत एसएसआय ब व दीपक क्रिकेट क्लबच्या संघांनी विजयी सलामी दिली़ एसएसआय ब संघाने फ्रेंड्स क्रिकेट क्लबवर तीन विकेट्स शिल्लक राखून विजयी सलामी दिली़ फ्रेंड्स क्रिकेट क्लबने 20 षटकांत सर्वबाद 133 धावा केल्या़ प्रत्युत्तरात एसएसआय ब संघाने 18 षटकांत सात गड्यांच्या मोबदल्यात 134 धावा काढून तीन विकेट्सने विजय मिळवला़
दुसर्‍या सामन्यात दीपक क्रिकेट क्लबने नांदणी संघावर 14 धावांनी मात केली़ नांदणी संघाने 20 षटकात 134 धावा केल्या़ प्रत्युत्तरात दीपक संघाने सर्वबाद 120 धावा केल्या़
प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन मनपा क्रीडाधिकारी नजीर शेख यांच्या हस्ते झाल़े यावेळी संघाचे अध्यक्ष जगन व्यवहारे, चंद्रकांत कदम, विजयकुमार बिराजदार, क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बसरू, शत्रुघ्न चटके, विजय पाटील, गजानन लामकाने, शिवाजी चटके, प्रकाश सुरवसे, किरण बायस, पांडुरंग पवार, वसंत कुलकर्णी, प्रकाश पवार, अनिल इंगळे, तानाजी सावंत आदी उपस्थित होत़े या स्पर्धेत 24 संघांनी भाग घेतला आह़े

Web Title: SSI, Deepak Sangh's winning salute

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.