शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
4
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
5
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
6
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
7
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
8
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
9
राजनाथ सिंह यांच्याकडून पाकला क्लीनचिट, संरक्षण मंत्र्यांचे वक्तव्य देशविरोधी; काँग्रेसचा घणाघात
10
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
11
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
12
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
13
काय वाईट दिवस आले याच्यावर! एकेकाळी बॉलिवूड गाजवणाऱ्या अभिनेत्याचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
14
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
15
Bengaluru: बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
16
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
17
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
18
निरोगी आरोग्यासाठी आहे ‘डिजिटल फास्टिंग’ आवश्यक; सात प्रमुख फायदे कोणते? 'अशी' करा सुरुवात
19
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
20
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
Daily Top 2Weekly Top 5

श्रीलंकेचा १३८ धावांत खुर्दा

By admin | Updated: December 28, 2014 01:03 IST

श्रीलंकेने फॉलोआॅननंतर दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करताना दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ८४ धावांपर्यंत मजल मारली आहे़

ख्राईस्टचर्च : पहिल्या डावात न्यूझीलंडच्या वेगवान माऱ्यासमोर अवघ्या १३८ धावांत गारद झालेल्या श्रीलंकेने फॉलोआॅननंतर दुसऱ्या डावात चांगली सुरुवात करताना दुसऱ्या दिवसअखेर बिनबाद ८४ धावांपर्यंत मजल मारली आहे़न्यूझीलंडने आपल्या पहिल्या डावात सर्वबाद ४४१ धावा केल्यानंतर श्रीलंकेचा डाव ४२़४ षटकांत १३८ धावांत गुंडाळला होता़ यामुळे किवी संघाने ३०३ धावांची मोठी आघाडी घेत लंकेला फॉलोआॅन दिला़ यानंतर पाहुण्या संघाच्या सलामीवीरांनी दुसऱ्या डावात टीमला चांगली सुरुवात करून दुसऱ्या दिवसअखेर संघाचा स्कोअर ३५ षटकांत बिनबाद ८४ पर्यंत पोहोचविला़ दरम्यान, असे असले तरी अद्याप लंका संघ बॅकफुटवर आहे़ त्यांना डावाने पराभव टाळण्यासाठी २१९ धावांची आवश्यकता आहे़ दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा लंकेचा दिमुथ करुणारत्ने ४९ आणि कौशल सिल्वा ३३ धावांवर खेळत होता़ लंकेच्या पहिल्या डावात न्यूझीलंडच्या निल वॅग्नर आणि ट्रेंट बोल्ट यांनी प्रत्येकी ३ बळी मिळविले़ पहिल्या डावात केवळ लंकेचा कर्णधार एंजेलो मॅथ्यूज यालाच सर्वाधिक ५० धावांची खेळी करता आली़ त्याआधी न्यूझीलंडने दुसऱ्या दिवशी सकाळी ७ बाद ४२९ धावांपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली आणि त्यांनी आपले अखेरचे ३ गडी १२ धावांत गमावले़ या सामन्यात दुसऱ्या दिवशी तब्बल १३ विकेट पडल्या़ पाहुण्या संघाची पहिल्या डावात ३ बाद १५ अशी अवस्था झाली होती़ यानंतर अखेरपर्यंत या संघाला सावरता आले नाही़ हा संघ १३८ धावांत तंबूत परतला; मात्र दुसऱ्या डावात श्रीलंकेच्या फलंदाजांनी न्यूझीलंडच्या गोलंदाजांचा नेटाने सामना करताना आपली विकेट गमावली नाही़ (वृत्तसंस्था)संक्षिप्त धावफलक : न्यूझीलंड पहिला डाव : ८५़५ षटकांत सर्वबाद ४४१़ श्रीलंका पहिला डाव : ४२़४ षटकांत सर्वबाद १३८़ (एंजेलो मॅथ्यूज ५०, लाहिरू थिरीमाने २४, धम्मिका प्रसाद २४़ ट्रेंट बोल्ट ३/२५, निल वॅग्नर ३/६०, टीम साउथी २/१७, जेम्स निशाम २/२८)़ श्रीलंका दुसरा डाव : ३५ षटकांत बिनबाद ८४़ दिमुथ करुणारत्ने खेळत आहे ४९, कौशल सिल्वा खेळत आहे ३३़