क्रीडा : सचिन तेंडुलकर
By Admin | Updated: February 18, 2015 00:13 IST2015-02-18T00:13:22+5:302015-02-18T00:13:22+5:30
टीम इंडियाला आफ्रिकेकडून धोका : सचिन

क्रीडा : सचिन तेंडुलकर
ट म इंडियाला आफ्रिकेकडून धोका : सचिन नवी दिल्ली : वर्ल्डकपमधील सलामीच्या सामन्यात पाकिस्तानवर शानदार विजय मिळविल्यामुळे भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावला आहे; मात्र असे असले तरी येत्या रविवारी होणार्या लढतीत टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सावध खेळ करावा लागेल़ कारण चोकर्स नावाने प्रसिद्ध हा संघ केव्हाही प्रतिस्पर्धी संघाला धोका पोहोचवू शकतो़ सचिन म्हणाला, 'बलाढ्य दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताला विजय मिळवायचा असेल, तर सलामीवीर फलंदाजांनी मजबूत सुरुवात करून देणे गरजेचे आहे़ त्याचबरोबर या संघाविरुद्ध एकेरी आणि दुहेरी धावा काढताना विशेष खबरदारी घ्यावी लागेल़ कारण क्षेत्ररक्षणात या संघाला तोड नाही़ विशेष म्हणजे वर्ल्डकपच्या जेतेपदाचे दावेदार असलेल्या संघात आफ्रिकेचा समावेश आहे़ त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात आतापर्यंतचा सर्वोत्कृष्ट खेळ करावा लागेल़' मास्टर ब्लास्टर म्हणाला, 'पाकिस्तानच्या तुलनेत आफ्रिका संघ अधिक मजबूत आहे़ फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणात या तीनही विभागांत संघ इतर संघांच्या तुलनेत पुढे आहे़ विशेषत: आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज डेल स्टेनसमोर भारतीय खेळाडूंची खरी कसोटी राहील़ या सामन्यात भारताचा अनुभवी खेळाडू रोहित शर्मावर सर्वांची नजर राहील'़ टीम इंडियाला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवायचा असेल तर कुण्या एका खेळाडूवर अवलंबून न राहता खेळाडूंनी सांघिक कामगिरी करणे गरजेचे आहे़ असे झाल्यास टीम इंडियाला विजयापासून कुणीच रोखू शकत नाही, असेही सचिन तेंडुलकर याने म्हटले आहे़ (वृत्तसंस्था)०००००